Good News : साताऱ्याला जोडणाऱ्या रेल्‍वेसेवांच्या विस्‍तारास रेल्‍वेमंत्र्यांची मंजुरी; उदयनराजेंनी दिली महत्त्वाची अपडेट

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
MP Udayanraje Bhosale met Railway Minister Ashwini Vaishnaw
MP Udayanraje Bhosale met Railway Minister Ashwini Vaishnawesakal
Updated on
Summary

सातारा रेल्वे स्थानकावरून दादरला मिरज-पंढरपूरमार्गे जाणारी ११०२८ क्रमांकाची रेल्वेसेवा दर सोमवारी, मंगळवारी आणि शनिवारी मार्गस्थ होणार आहे.

सातारा : मध्य रेल्वेची दादर-पंढरपूर रेल्वे सेवा मिरज- सांगलीमार्गे साताऱ्यापर्यंत तसेच ११०२८ क्रमांकाची रेल्‍वेसेवा पंढरपूरऐवजी सातारा (Satara Railway Service) येथून मिरजमार्गे पंढरपूर-दादर अशी सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

ही सेवा दर रविवारी, सोमवारी आणि शुक्रवारी साताऱ्यापर्यंत मार्गस्थ होईल. सातारा रेल्वे स्थानकावरून दादरला मिरज-पंढरपूरमार्गे जाणारी ११०२८ क्रमांकाची रेल्वेसेवा दर सोमवारी, मंगळवारी आणि शनिवारी मार्गस्थ होणार असल्‍याची माहिती खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिली.

निवेदनात नमूद केले आहे, की सातारा ते दादर मुंबई तसेच सातारा ते पंढरपूर अशी नवीन रेल्वे सेवा तसेच मिरज-पुणे अशी सुपर फास्ट सेवा सुरू करण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून धावणाऱ्या क्रमांकाधारित रेल्वेगाड्यांना गडकिल्ल्यांची नावे देण्याची, यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस, कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसला सातारा येथे थांबा देण्‍याची.

MP Udayanraje Bhosale met Railway Minister Ashwini Vaishnaw
Koyna Dam Project : मुनावळेत जागतिक जलपर्यटनाला हिरवा कंदील; तब्बल 45 कोटींचा निधी मंजूर, पर्यटनाला मिळणार चालना

तसेच मुंबई-सातारा-मिरज नवीन गाडी अजिंक्यतारा एक्स्प्रेस या नावाने सुरू करण्यास लोणंदसह इतर स्‍थानकांच्‍या विकासासाठीची मागणी करत रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. भेट तसेच पाठपुराव्‍यामुळे साताऱ्याला जोडणाऱ्या रेल्‍वेसेवांचा विस्‍तार करण्‍यास त्‍यांनी मंजुरी दिल्‍याची माहिती उदयनराजे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

MP Udayanraje Bhosale met Railway Minister Ashwini Vaishnaw
आयटी कंपन्या कोल्हापूरला आणण्यासाठी मी मदत करतो; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांचं आश्वासन

अशी असेल वेळ

नवीन सुधारित विस्तारित वेळापत्रकाप्रमाणे दादरवरून ही रेल्वे प्रत्येक रविवार, सोमवार, शुक्रवारी रात्री ११.५५ वाजता सुटेल, तर दुसऱ्या दिवशी दुपारी २.१० मिनिटांनी सातारा येथे पोचणार आहे. सातारा- दादर ही रेल्वे प्रत्येक सोमवार, मंगळवार, शनिवार या दिवशी सातारावरून दुपारी ३.२० वाजता सुटणार असून, दादर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३५ वाजता पोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.