Ashwini Vaishnav : 'या' तालुक्यांत रेल्वे आणण्याची भाजप आमदाराची तयारी; रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या महत्वाच्या सूचना

'माण तालुक्यात जागा उपलब्ध असल्याने कॉरिडॉर एमआयडीसी उभारली जाणार'
Railway
Railway esakal
Updated on
Summary

आमदार गोरे यांनी पुसेगाव-दहिवडी-म्हसवड-माळशिरस-पंढरपूर लोहमार्ग मिळावा, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याकडं केली.

सातारा : जलसंधारण, एमआयडीसी, पुणे-बंगळुरू ग्रीन महामार्गानंतर आता आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी माण, खटाव तालुक्यांत (Man, Khatav) प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे आणण्याची तयारी केली आहे.

पुसेगाव-दहिवडी-म्हसवड-माळशिरस-पंढरपूर लोहमार्ग (Railway) मिळावा, अशी मागणी श्री. गोरे यांनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याकडे केली. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी (Ashwini Vaishnav) या मार्गासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Railway
Malvan : कोकणात सापडला आणखी एक 'ऐतिहासिक खजिना'; लांबलचक सड्यावर आढळल्या कातळशिल्पांच्या पाऊलखुणा!

माण तालुक्यात जागा उपलब्ध असल्याने येथे कॉरिडॉर एमआयडीसी उभारली जाणार आहे. या विकासाच्या गतीला वेगाने व सुखकर प्रवास करणे शक्य होण्यासाठी नवीन लोहमार्ग माण तालुक्यातून नेण्यासाठी आमदार गोरेंनी प्रयत्न सुरू केले आहेत. पुसेगाव-दहिवडी-म्हसवड-माळशिरस-पंढरपूर लोहमार्ग मिळावा, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याकडे केली.

Railway
Ganeshotsav : चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर! गणेशोत्सवासाठी मुंबईतून 2 हजार, तर रत्नागिरीतून 1 हजार 550 गाड्यांचं नियोजन
Railway Minister Ashwini Vaishnav
Railway Minister Ashwini Vaishnav

या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते. या मागणीवरून रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी सातारा ते पंढरपूर मार्गासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या मार्गासाठी रेल्वे मिळाल्यानंतर माण, खटाव भागासाठी दळणवळण सुखकर आणि कमी खर्चाचे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.