सातारा-सोलापूर रेल्वेसाठी खासदार उदयनराजेंना साकडे

Satara and Solapur Railway
Satara and Solapur Railwayesakal
Updated on

सातारा : सातारा आणि सोलापूरची जोडणी रेल्‍वेने (Satara and Solapur Railway) व्‍हावी, यासाठीचा प्रस्‍ताव गेली ११ वर्षे रेल्‍वे मंत्रालयात (Ministry of Railways) धूळखात पडून आहे. हा प्रस्‍ताव मार्गी लागण्‍यासाठी खासदार उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) पुढाकार घेण्‍याची मागणी पश्चिम महाराष्‍ट्रासह सोलापुरातील रेल्‍वे प्रवासी ग्रुप (Railway Traveler Group) आणि प्रवासी संघाने केली आहे. (Railway Travelers Group Demands MP Udayanraje Bhosale To Start Satara And Solapur Railways Satara Marathi News)

Summary

गेल्‍या अनेक वर्षांपासून पुणे, कोल्‍हापूरच्‍या मानाने सातारा शहराचा विस्‍तार, विकास तांत्रिक, अतांत्रिक आणि राजकीय साठमारीत अडकला आहे.

गेल्‍या अनेक वर्षांपासून पुणे, कोल्‍हापूरच्‍या मानाने सातारा शहराचा विस्‍तार, विकास तांत्रिक, अतांत्रिक आणि राजकीय साठमारीत अडकला आहे. ही राजकीय साठमारी थांबवत लोकप्रनिधींनी रस्‍त्‍यांसह लोहमार्गाच्‍या विकासासाठी पुढाकार घेणे आवश्‍‍यक आहे. विपुल नैसर्गिक संपदा, विस्‍तीर्ण जागा, जलसिंचन प्रकल्‍प, कमी खर्चात उपलब्‍ध होणारे कुशल मनुष्‍यबळ, भलीमोठी औद्योगिक वसाहत, रेल्‍वे सुविधा (Railway facilities), आशियायी महामार्गाच्‍या यादीत असलेला सहापदरी महामार्ग, मुंबई, पुणे, कोल्‍हापूर, बंगळूरसह इतर मोठ्या शहरांशी असणारे व्‍यावसायिक संबंध, मराठा साम्राज्‍याच्या राजधानीमुळे सातारा शहराचा नावलौकिक देशभरात आहे. मात्र, या नावलौकिकाला साजेसा विकास या ठिकाणचा होऊ शकला नाही. त्‍यामागील तांत्रिक, अतांत्रिक आणि राजकीय, अराजकीय कारणांची चर्चा नेहमीच साताऱ्या‍च्‍या गल्‍लीबोळात सुरू असते.

Satara and Solapur Railway
संघर्षमय जीवनानंतर मिळालेले यश आनंददायी : पंतप्रधान माेदी

जिल्‍ह्याचा कानाकोपरा महामार्ग, राज्‍यमार्ग, प्राथमिक मार्गांमुळे जोडला गेला असला तरी त्‍या तुलनेत येथील लोहमार्गाचा विकास होऊ शकला नाही. सध्‍या माहुली येथून अनेक प्रवासी दररोज पुणे, सांगली, कोल्‍हापूरकडे जातात. मात्र, या मार्गावर उपलब्‍ध असणाऱ्या एक्स्प्रेसची संख्‍या अत्‍यंत कमी असून तुलनेत प्रवासासाठी जास्‍त वेळ लागतो. पुणे, सांगली लोहमार्गामुळे जोडला असतानाच सातारा-कऱ्हाड-सांगली-पंढरपूर-सोलापूर एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी पश्चिम महाराष्‍ट्रातील (West Maharashtra) रेल्‍वे प्रवासी ग्रुप, सोलापूर प्रवासी संघ, सातारा प्रवासी संघाने लावून धरली आहे. त्यासाठी आवश्‍‍यक असणारी लोहमार्ग जोडणी पूर्ण झाली असून त्‍यामार्गावरून रेल्‍वे सुरू करण्‍याच्‍या मागणीचा पाठपुरावा गेली ११ वर्षे सुरू आहे. प्रवाशांनी केलेल्‍या मागणीनुसार रेल्‍वेसेवा सुरू झाल्‍यास टेक्स्टाईल हब आणि शुगर हबची जोडणी होणे शक्‍य होणार आहे.

Satara and Solapur Railway
'आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला; मराठ्यांसाठी खासदारांनी राजीनामा द्यावा'

फलटण-बारामती रेल्वे सुरु होते, मग सातारा-सोलापूर का नाही?

सातारा-पुणे आणि सातारा-सांगली या लोहमार्गाच्‍या विस्‍तारीकरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. हे काम अत्‍यंत धिम्‍या गतीने असल्‍याने महामार्गासह इतर सेायींवर त्‍याचा ताण येत आहे. हे काम प्रलंबित असतानाच फलटण-बारामती रेल्वे ‍सुरू झाली. ती होते मग सातारा-सोलापूर रेल्वेसेवा का नाही, असा सवालही प्रवासी संघाने विचारला आहे. याच अनुषंगाने त्‍यांनी खासदार सुरेश प्रभू यांच्‍याशी पत्रव्‍यवहार केला होता. रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांनाही ही रेल्वेसेवा सुरू करण्‍याबाबतची कार्यवाही करण्‍याचे पत्र दिले आहे.

Satara and Solapur Railway
मुख्‍याधिकाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या पवारांचा राजीनामा

उदयनराजेंनी लक्ष घालावे

या रेल्‍वेसाठी केंद्राशी सातत्‍याने संपर्क साधणे, पत्रव्‍यवहार करणे आवश्‍‍यक आहे. हे काम रेल्‍वे समितीचे सदस्‍य असणाऱ्या खासदार उदयनराजेंनी पुढाकार घेतल्‍यास मार्गी लागू शकते, असा विश्‍‍वासही प्रवासी संघाने व्‍यक्‍त केला आहे. त्यासाठी त्‍यांच्‍याकडून आगामी काळात उदयनराजेंना भेटून प्रत्‍यक्ष निवेदन देण्‍यात येणार आहे.

Railway Travelers Group Demands MP Udayanraje Bhosale To Start Satara And Solapur Railways Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.