Satara Rain : धोका वाढतोय! दरडीच्या छायेतील 489 कुटुंबांचं स्‍थलांतर; 'या' तालुक्‍यांतील गावांचा समावेश

स्‍थलांतरितांच्‍या औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना शंभूराज देसाई यांनी दिल्‍या.
Satara landslide
Satara landslideसकाळ
Updated on
Summary

कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जमीन उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गाचा अवलंब करावा.

सातारा : जिल्‍ह्यातील वाई, पाटण, जावळी, सातारा, महाबळेश्‍‍वर तालुक्‍यांतील दरडप्रवण क्षेत्रातील ६५ गावांमधील ४८९ कुटुंबांचे तात्‍पुरत्‍या स्वरूपात उभारलेल्‍या निवारा केंद्रात स्‍थलांतर केल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

पालकमंत्री शंभूराज देसाई शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी आदी उपस्‍थित होते.

Satara landslide
Kolhapur Rain : 'पंचगंगा' इशारा पातळी गाठणार! राधानगरीत 5.95 TMC तर 'या' 14 धरणांत किती आहे साठा? जाणून घ्या..

जिल्‍हाधिकारी म्‍हणाले, ‘‘जिल्ह्यात तात्पुरते ४७ निवारा शेड बांधण्यात आले असून, सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथील १८, सांडवली येथील २०, भैरवगड येथील ६०, जावळी तालुक्यातील बोंडारवाडी येथील ६, भुतेर येथील ३, वहिटे येथील ३, वाटंबे येथील २, वाई तालुक्यातील जोर येथील ८, गोळेगाव-गोळेवस्ती येथील ४, पाटण तालुक्यातील मिरगाव.

Satara landslide
निवडणुका जवळ आल्या, की मतदारसंघात दिसणारे केसरकर आहेत कुठे? पूरस्थितीवरुन ठाकरे गटाचा सवाल

तसेच हुंबरळी, ढोकावळे येथील १५०, गुंजाळी येथील ६, म्हारवंड येथील ५६, जोतिबाची वाडी येथील ५, सवारवाडी येथील १८, पाबळवाडी येथील ४, बोंगेवाडी येथील १४, केंजळवाडी येथील २१, कळंबे येथील ४, जिमनवाडी येथील २२, तर महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतुरबेट, मालूसर, एरणे येथील ६५ कुटुंबांचा स्‍थलांतरितांमध्‍ये समावेश आहे.

बैठकीत निवारा शेडमधील नागरिकांना अन्न, शुद्ध पिण्याचे पाणी, औषधे आदी सर्व आनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जमीन उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गाचा अवलंब करावा. स्‍थलांतरितांच्‍या औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना शंभूराज देसाई यांनी दिल्‍या.

Satara landslide
Kolhapur Rain : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर! 75 बंधारे पाण्याखाली; जाणून घ्या कोणते मार्ग सुरु, कोणते बंद

ते म्हणाले, की पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी नालेसफाई करत साथरोग फैलावू नये, यासाठी फॉगिंग करावे. नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्‍याबरोबरच खंडित विद्युतपुरवठा सुरळीत करण्‍यासाठीच्‍या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्‍या. खासदार श्रीनिवास पाटील यांनी जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कार्यक्रमाची गतीने अंमलबजावणी होण्‍यासाठी दरमहा बैठक घेत आढावा घेण्‍याची सूचना केली. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी संवेदनशील ठिकाणी रात्रीच्या पोलिसांच्या गस्ती वाढविल्‍याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.