Koyna Dam : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; धरणातील विसर्ग २० हजार क्युसेकवर, नद्यांच्या पाणी पातळीतही घट

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या दोन दिवसापासुन उघडीप दिली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धऱणातील पाणी साठ्यात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली.
koyna dam water release
Koyna Dam water releasesakal
Updated on

कऱ्हाड - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या दोन दिवसापासुन उघडीप दिली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धऱणातील पाणी साठ्यात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. धरणातुन सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो ४० हजारवर आज सोमवारी दुपारी करण्यात आला होता. त्यात आणखी कपात करुन तो विसर्ग सोमवारी रात्री आठ वाजता २० हजार क्युसेकवर आणण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होवु लागली आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच २५ जुलै २०२४ रोजी धऱणाचे सहा वक्र दरवाजे उचलुन १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.

त्यानंतर त्याच रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करुन नदीत २० हजार क्युकेस सोडण्यात आले. त्यानंतर २६ जुलैला त्या विसर्गात वाढ करुन ३० हजार क्युसेक करण्यात आला. त्यानंतर तो वाढवुन ३० जुलैला ४० हजार तर एक ऑगस्टला पुन्हा ५० हजार विसर्ग सुरु करण्यात आला होता.

त्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवुन पुराचा धोका निर्माण झाला होता. गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने धरणातुन सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो आज सोमवारी दुपारी ४० हजारवर आणण्यात आला. त्यानंतर आज सोमवारी रात्री तो २० हजार क्युसेक करण्यात आला आहे.

त्यामुळे पायथा विजगृहातुन सोडण्यात आलेला दोन हजार १०० क्युसेक असा २१ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. धरणातुन विसर्ग कमी केल्याने आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कृष्णा-कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होवु लागली असुन पुराचा धोका तुर्ततरी टळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.