तेलबियांचे उत्पन्न घटण्याच्या मार्गावर; पावसाचा पिकांना मोठा फटका

Oilseeds
Oilseedsesakal
Updated on
Summary

रब्बी हंगामात सोयाबीन, भात व भुईमूग या मुख्य पिकांबरोबर सूर्यफूल, करडई, तीळ आदी तेलबियांची पिके घेतात.

रेठरे बुद्रुक (सातारा) : शिवारात रब्बी हंगामातील (Rabi Season) कडधान्याच्या काढण्या सुरू आहेत. यंदा अतिवृष्टी (Heavy Rain) व महापुराने शेतातील उभ्या पिकांना हानी पोचली. या नुकसानीची भरपाई मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. अशातच रब्बीतील कडधान्यांचे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांना नवे आव्हान पेलावे लागत आहे. कडधान्यातील तेलबिया पिकांवर अतिवृष्टी, महापूर, वादळी पाऊस व करपा रोग आदी संकटे कोसळल्याने सुमारे ३५ टक्क्याने उत्पन्न घटेल, असा अंदाज आहे.

Oilseeds
साताऱ्यात वनविभागाची धाड; 4 लाखांच्या इंद्रजालासह 80 किलो चंदन, 600 मोरपीस जप्त

रब्बी हंगामात सोयाबीन, भात व भुईमूग या मुख्य पिकांबरोबर सूर्यफूल, करडई, तीळ आदी तेलबियांची पिके घेतात. पिकांच्या काढणीतून शेतकऱ्यांचे अर्थचक्र फिरते. यंदा शेतकऱ्यांचे हे चक्र उलटे फिरले आहे. अतिवृष्टी व महापूर आल्यानंतर नदी व ओढ्याकाठच्या शेतीतील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. ऊस व सोयाबीन पिके पाण्याखाली गेल्याने काही क्षेत्रातील पीक वाया गेले. तेलबिया फुलकळी बहरणीच्या टप्प्यात करप्याचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न घटले. प्रत्यक्ष काढणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर उत्पन्नात घट आढळून येत आहे. प्रत्यक्षात काढण्या सुरू झाल्यानंतर मिळणारे उत्पन्न पाहून शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. सूर्यफूल, करडई, तीळ आदी तेलबिया पिकांची हानी झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर संकट आल्याने आर्थिक अडचणी वाढणार आहेत.

Oilseeds
संपूर्ण महाराष्ट्राला माहितीय मी कसा आहे : अजित पवार

मला एकरी २४ पोती भुईमूग शेंगा होतात. यंदा अतिवृष्टी व करप्याच्या प्रादुर्भावामुळे केवळ आठ पोती उत्पन्न मिळाले आहे. शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्या सोसण्यापलीकडे दुसरे काही करता येत नाही.

-भीमराव जाधव, प्रगतशील शेतकरी, रेठरे खुर्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()