Political News : अजित पवार मुख्यमंत्री होणार? शिंदे सरकारला कोणताही धोका..; काय म्हणाले क्षीरसागर?

राज्यात शिंदे सरकारचे 16 आमदार अपात्र होणार असून, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Ajit Pawar - Eknath Shinde
Ajit Pawar - Eknath Shindeesakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे.

सातारा : राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) यांच्या नेतृत्वाखालील भाजप, शिवसेना युतीच्या सरकारला कोणताही धोका नाही. केवळ बॅनरबाजी करून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. या माध्यमातून विरोधक राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केली.

'कोणीही बॅनर लावला म्हणून तो मुख्यमंत्री होत नाही'

शासकीय योजनांची जत्रा आणि शिवदूतांच्या नेमणुकीबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात शिंदे सरकारचे 16 आमदार अपात्र होणार असून, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. याबाबत क्षीरसागर म्हणाले, ‘‘असे काहीही नाही कोणीही बॅनर लावला म्हणून तो मुख्यमंत्री होत नाही.

Ajit Pawar - Eknath Shinde
Karnataka Election : 'या' मतदारसंघातील 35 पैकी 14 उमेदवार दहावी पास, तर चौथी शिक्षण झालेलाही उमेदवार रिंगणात

'शिंदे सरकार कालावधी पूर्ण करणार'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. हे सरकार कालावधी पूर्ण करणार आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजप युतीचेच सरकार येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Ajit Pawar - Eknath Shinde
Karnataka Election 2023: 'या' काँग्रेस नेत्यांचा पराभव करण्यासाठी अमित शहांचा मास्टर प्लान; भाजप रणनितीकारांनी लावली ताकद

'क्षीरसागरांनी अजित पवारांची उडवली खिल्ली'

आमदार अपात्रेच्या निकालासंदर्भात क्षीरसागर म्हणाले, ‘‘हा सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारितील विषय आहे. त्यावर मी बोलू शकत नाही; पण निकाल आमच्याच बाजूने लागणार असा आमचा ठाम विश्वास आहे. आमच्या मांडणीत खरेपणा आहे. त्यामुळे खरेपणाला न्याय मिळणार हे निश्चित आहे.’’ अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘‘कालच महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमूठ सभा झाली. त्या सभेला अजित पवार उपस्थित होते. तिकडेही त्यांची उपस्थिती व इकडे भाजप प्रवेश असे होऊ शकत नाही.’’ एकाच वेळी विरोधक काय काय करतील? अशा शब्दात त्यांनी पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेची खिल्ली उडवली.

Ajit Pawar - Eknath Shinde
Shashikant Shinde : 'त्यांना' नाकारलं, 'तो' रिपोर्ट अजित पवारांना देणार; आमदार शिंदेंचा थेट इशारा

योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविणार

शासकीय योजनांच्या जत्रेच्या माध्यमातून शासनाच्या सर्व विभागांच्या योजना सर्वसामान्य जनतेला सांगणे. त्याचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचवणे याकरिता मी साताऱ्यात आलो आहे, असे सांगून क्षीरसागर म्हणाले, ‘‘प्रत्येक शहरात, जिल्ह्यात, वॉर्ड तेथे शिवसैनिक आणि या योजनांच्या प्रसिद्धीसाठी शिवदूतांची नेमणूक करणे आदी कार्यक्रमाचे नियोजन आहे. याचा व्यापक प्रसार आणि प्रचारासाठी मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()