Highway Accident : आनंदाच्या क्षणीच काळाचा घाला! रक्षाबंधन करून परतताना अपघात; सहा वर्षांच्या चिमुरडीसह दाम्पत्य गंभीर

अपघातात एक सहा वर्षांची बालिका व दांपत्य गंभीर जखमी झाले.
Pune-Bangalore National Highway Road Accident
Pune-Bangalore National Highway Road Accidentesakal
Updated on
Summary

कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या एनडीआरएफ जवानांनी जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी हलविण्यासाठी मदत केली.

वहागाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) वहागाव (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रक्षाबंधन (Rakshabandhan) करून परतत असणाऱ्या दुचाकीधारकाला दुसऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दांपत्यासह त्यांची सहा वर्षांची बालिका जखमी झाली.

Pune-Bangalore National Highway Road Accident
Dandoba Temple : 1 हजार हेक्टरमध्ये पसरलेल्या डोंगरावर आहे प्राचीन दंडोबा मंदिर; गुहेतच आहेत नागाच्या वेटोळ्यातील मूर्ती!

महामार्गावर रस्ते कंपनी ठेकेदाराने ठेवलेल्या सिमेंट ब्लॉकला दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला, त्यामुळे वाहनधारकांनी संबंधित रस्ते कंपनीच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाडहून साताऱ्याच्या दिशेला निघालेली दुचाकी (एमएच ११ एयू २१८४) रस्त्यावरील सिमेंट ब्लॉकला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात एक सहा वर्षांची बालिका व दांपत्य गंभीर जखमी झाले. हे सर्वजण सातारा तालुक्यातील देवकरवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Pune-Bangalore National Highway Road Accident
Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

मात्र, त्यांची नावे समजू शकली नाहीत. याच दरम्यान, कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या एनडीआरएफ जवानांनी जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी हलविण्यासाठी मदत केली. एनडीआरएफ जवानांनी प्रथमोपचार केल्याने बालिकेला वेळेत उपचार मिळाले. अपघातातील कुटुंबाला घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमने मोलाची मदत केली.

Pune-Bangalore National Highway Road Accident
Bedag : बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या गावात मोठा ठराव; विरोधात निकाल जाताच ग्रामसभेतून आंबेडकरी समाज पडला बाहेर

यावेळी महामार्ग पोलिस विभागाचे पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर यांच्यासह त्यांचे पोलिस सहकारी तसेच तळबीड पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रवीण फडतरे व ग्रामस्थांनी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत तळबीड पोलिसांत नोंद झालेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.