Political : फार्म हाऊसवर ठरला 'मास्टर प्लान'; भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांत खलबत्तं

Satara Bank Election
Satara Bank Electionesakal
Updated on
Summary

सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून न घेण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे उदयनराजे संतप्त झालेले आहेत.

सातारा : सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची (Satara Bank Election) धामधुम सुरू आहे. खासदार उदयनराजेंना (MP Udayanraje Bhosale) सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्यास नकार दिल्याने ते सध्या आक्रमक होऊन जिल्हा बँकेच्या संचालकांवर टीकेची झोड उठवू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज सातारा तालुक्यातील परळीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले (Raju Bhosale) यांच्या फार्म हाऊसवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale), प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर व जिल्हा बँकेच्या काही संचालकांची खलबते झाली. एका गुरूजींच्या सत्कार समारंभानिमित्त एकत्र आलेल्या या मंडळींनी फार्म हाऊसवर जाऊन एकत्र जेवण करत जिल्हा बँकेची रणनिती ठरवलीय. दरम्यान, प्रभाकर घार्गे यांच्याविषयी देखील चर्चा झाल्याचे समजतेय.

बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आतापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही, तर काही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अडचण होऊ नये म्हणून त्यांच्या विरोधात अर्ज भरलेल्यांची मनधरणी सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केलीय. येत्या सात नोव्हेंबरला सर्वसमावेशक पॅनेलचे उमेदवार निश्चित करून त्यानंतरच्या दोन दिवसांत उर्वरित सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामध्ये या नेत्यांन कितीपत यश येते, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून न घेण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे उदयनराजे संतप्त झालेले आहेत. ते गेल्या आठवडाभरापासून जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व अध्यक्षांवर टीकेची झोड उठवत इशाराही देत आहेत. ते गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीसह आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी तीन उमेदवार तयार ठेवले आहेत.

Satara Bank Election
ठरलं! उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादी देणार तगडा उमेदवार

या सर्व पार्श्वभूमीवर आज परळी खोऱ्यातील एका गुरूजींच्या सत्कारानिमित्त जिल्हा बँकेतील ही सर्व संचालक मंडळी परळीत गेली होती. या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक व माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्या फार्म हाऊसवर जेवणाचा बेत आखला होता. यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार व विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक नितीन पाटील, अनिल देसाई, बिनविरोध निवडून आलेले संचालक राजेंद्र राजपुरे, यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते. येथे या मंडळींनी जेवणानंतर एकत्र बसून जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत खलबते केली. याविषयी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, परळी खोऱ्यातील गुरूजींच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्यानंतर राजू भोसले यांच्या फार्म हाऊसवर जेवणाचा बेत आखला होता, त्याठिकाणी उपस्थित राहिलो, असं त्यांनी सांगितलं.

Satara Bank Election
काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का; 'शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.