दोन्ही राजेंमधला वाद मिटला? उदयनराजे-रामराजे एकमेकांच्या शेजारी बसले अन् हास्यविनोदातही रमले, अनेकांच्या उंचावल्या भुवया

परिवर्तनाची सुरुवात फलटणमधून होणार असल्याचे सांगत उदयनराजेंनी निंबाळकरांना आव्हान दिले होते.
Ramraje Nimbalkar Udayanraje Bhosale
Ramraje Nimbalkar Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

फलटण आणि साताऱ्याच्या राजेंमध्ये (Udayanraje Bhosale) दिलजमाई कधी झाली, असा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik- Nimbalkar) व खासदार उदयनराजे भोसले एकमेकांच्या शेजारी बसून हास्यविनोदात रमल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर काहींचे चेहरे पडले होते.

फलटण आणि साताऱ्याच्या राजेंमध्ये (Udayanraje Bhosale) दिलजमाई कधी झाली, असा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. जिल्ह्यात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची दहिवडीत सभा होती. या वेळी पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदेंनी रामराजे नाईक- निंबाळकर व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

Ramraje Nimbalkar Udayanraje Bhosale
Sangli Politics : जयंत पाटलांना मोठा धक्का! 'हे' प्रमुख पदाधिकारी अजितदादांच्या गोटात; सांगलीचं बदलणार राजकारण?

परिवर्तनाची सुरुवात फलटणमधून होणार असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही निंबाळकरांना आव्हान दिले. याची चर्चा सुरू असतानाच आज दुपारी सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेसाठी सभागृहात जाताना ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले दोघे एकाच लिफ्टमधून खालच्या मजल्यावर गेले.

Ramraje Nimbalkar Udayanraje Bhosale
Solapur Politics : 83 वर्षाच्या योद्ध्याची नेत्यांना धास्ती; पवारांच्या 'या' खेळीचा अंदाज कोणालाच लागत नाही, दिग्गजांना चिंता

तसेच व्यासपीठावरही हे दोघे एकमेकांच्या शेजारी बसले, तसेच हास्यविनोदातही रमले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. काहींचे चेहरे पडले होते. या दोघांतील वाद आणि त्यातून त्यांनी एकमेकांना शासकीय विश्रामगृहात दिलेले आव्हान संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे.

Ramraje Nimbalkar Udayanraje Bhosale
Hasan Mushrif : शरद पवार कोल्हापुरात येताच मुश्रीफांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले, 'आम्ही पवार साहेबांसोबत नाही याचं दुःख होतंय'

पण आता हा वाद मिटला. दोघांत दिलजमाई झाली, हेच यातून जाणवत आहे. याबाबत दोघांनीही आपल्या भाषणात आमच्या संचालकांत मतभेद आहेत; पण बॅंकेत आम्ही कधी राजकारण केलेले नाही. त्यामुळे बॅंकेचा देशपातळीवर गौरव झाला आहे, असे स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()