फलटणचे हक्काचे पाणी आपण अन्यत्र कोठेही जाऊ देणार नाही, त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरी आपण मागे हटणार नसल्याचे सांगत रणजितसिंह यांनी विरोधकांना फटकारले.
फलटण शहर : माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत (Madha Lok Sabha Constituency Election) आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केले, त्यांच्यासोबत आपण यापुढेही कार्यरत राहणार आहोत. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचाच आमदार निवडून आणू, असा निर्धार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांनी व्यक्त केला.
सुरवडी (ता. फलटण) येथे आयोजित भाजप (BJP) पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. जिजामाला निंबाळकर, फलटणचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, धनंजय साळुंखे- पाटील, शहराध्यक्ष अनुप शहा यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ज्यांनी आपल्यासोबत गद्दारी केली त्यांना कधीही क्षमा करणार नसल्याचे स्पष्ट करून निंबाळकर म्हणाले, ‘‘खासदार असताना पूर्ण मतदारसंघाचा विचार करावा लागत असल्याने सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील विकासकामे, सर्वसामान्यांच्या अपेक्षा, तेथील विविध कार्यक्रम यासाठी वेळ देताना साहजिकच फलटणसाठी पूर्ण वेळ देता आला नाही; परंतु आता फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी पूर्णवेळ मोकळा आहे.
केंद्र आणि राज्यात आपली भाजपची सरकारे आहेत आणि ती आगामी काळातही राहणार आहेत. तेव्हा आता आपण पूर्ण वेळ फलटण येथे थांबून गेल्या पाच वर्षांप्रमाणे फलटण- कोरेगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’
फलटणच्या राजे गटाकडे गेल्या काही वर्षांपासून कोणतेही सत्तेचे पद नव्हते. त्यामुळे अस्वस्थ असलेली ही मंडळी फलटण, माण, सांगोला तालुक्यांचे हक्काचे पाणी बारामतीला देऊन पुन्हा पद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तथापि फलटणचे हक्काचे पाणी आपण अन्यत्र कोठेही जाऊ देणार नाही, त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरी आपण मागे हटणार नसल्याचे सांगत रणजितसिंह यांनी विरोधकांना फटकारले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.