साताऱ्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेच्या रणजितसिंह भोसलेंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

साताऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे.
Ranjitsingh Bhosle joined the Eknath Shinde Group
Ranjitsingh Bhosle joined the Eknath Shinde Groupesakal
Updated on
Summary

साताऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे.

सातारा : सातारा पालिकेची निवडणूक (Satara Municipal Election) जसजशी जवळ येत आहे, तसतसा शिंदे गटाला पाठिंबा मिळताना दिसतोय. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आधीच आक्रमक पवित्रा घेत आमचीच सत्ता येणार, असा दावा केलाय. परंतु, साताऱ्यात शिंदे गटाचं पारडं जड होताना दिसत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात शिंदे गटाचं बळ आता अधिक वाढलंय. साताऱ्यातील शिवसेनेच्या युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलंय. शिवाय, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळं साताऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा हादरा बसलाय.

Ranjitsingh Bhosle joined the Eknath Shinde Group
माझ्याकडचे अंतर्वस्त्र संपलेत, ते आणायला दिल्लीला गेलो होतो; असं का म्हणाले बसंत सोरेन?

शिवसेनेचे साताऱ्यातील युवा नेते आणि युवासेवा जिल्हाप्रमुख रणजित सिंह भोसले (Ranjitsingh Bhosale) हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रणजित सिंहे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते.

Ranjitsingh Bhosle joined the Eknath Shinde Group
Ganesh Visarjan : राज्यभरात लाडक्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()