Milk Union : 'जमीन न विकता दूध संघ चालवून दाखवू'; भाजपच्या माजी खासदाराचा कोणाला इशारा?

शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेल्या या दूध संघाची जमीन अडीच कोटी रुपयांसाठी विक्रीस काढली आहे.
Ranjit Singh Naik Nimbalkar
Ranjit Singh Naik Nimbalkaresakal
Updated on
Summary

तालुका दूध संघ मोडीत काढून राजे गटाने खासगी दूध संस्था वाढवली. खासगी दूध संघ ज्या क्षमतेने वाढवला, त्याच क्षमतेने सहकारी दूध संघ का वाढवता आला नाही?

फलटण शहर : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मिता असणारा फलटण तालुका सहकारी दूध संघ (Milk Union) मोडीत काढण्याचा राजे गटाचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. दूध संघ चालवता येत नसेल तर पायउतार व्हा. आम्ही जमीन न विकता, पाच वर्षांत अडीच कोटी कर्ज भरतो आणि दूध संघही चालवून दाखवतो, असे आव्‍हान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांनी राजे बंधूंना केले.

फलटण तालुका सहकारी दूध संघाच्या (Phaltan Taluka Cooperative Milk Union) जमीन विक्रीस विरोध दर्शवत प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन दिले. त्‍या वेळी ते बोलत होते. रणजितसिंह निंबाळकर पुढे म्हणाले, ‘‘तालुका दूध संघाचे एक लाख लिटरपर्यंत दूध संकलन होते. या दूध संघावर कधी कर्ज काढले? कशासाठी काढले? हे कोणाला माहीत नाही. हा दूध संघ राजे गटाच्या ताब्यात आहे.

शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेल्या या दूध संघाची जमीन अडीच कोटी रुपयांसाठी विक्रीस काढली आहे. तालुका दूध संघ मोडीत काढून राजे गटाने खासगी दूध संस्था वाढवली. खासगी दूध संघ ज्या क्षमतेने वाढवला, त्याच क्षमतेने सहकारी दूध संघ का वाढवता आला नाही, असा सवाल करीत संघाची जमीन विक्री करण्याचा राजे गटाचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. त्याची होणारी विक्री त्यांनी ताबडतोब थांबवावी.

Ranjit Singh Naik Nimbalkar
Vishalgad Riots : गजापुरात दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या दोषींना शोधून काढून कारवाई करणार; शंभूराज देसाईंचा इशारा

श्रीराम कारखान्याची जमीन विकली, मालोजीराजे बँक बुलडाणा बँकेला चालवायला दिली, खरेदी- विक्री संघ बंद केला. त्याचा बोर्डही गायब केला आहे. तालुक्यात उभ्या राहणाऱ्या तासगावकरांच्या कारखान्याला विरोध केला. माझ्याही कारखान्याला त्यांनी अनेक अडचणी निर्माण केल्या. एकंदरीत तालुक्यातील सहकार मोडीत काढण्याचं काम राजे गटाने सुरू केले आहे.

श्रीराम कारखान्याने विकलेली जमीन पालखी तळासाठी १०० कोटी रुपयाला विकण्याचा प्रस्ताव दिल्याचे समजत आहे, असे सांगत त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो, असेही रणजितसिंह म्‍हणाले. दूध संघ प्रश्नाबाबत आपण माजी खासदार रणजितसिंह यांच्या भूमिकेबरोबर आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चेतन शिंदे यांनी सांगितले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, विश्वासराव भोसले, चेतन शिंदे, प्रदीप झणझणे आदींच्या उपस्थितीत प्रांताधिकारी सचिन ढोले पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Ranjit Singh Naik Nimbalkar
शिवरायांचा आठवावा प्रताप! 17 व 18 व्या शतकातील 'ही' शिवकालीन शस्त्रे देतात शौर्याची प्रेरणा; वाघनखे किती महिने पाहता येणार?

पोलिसांवरील आरोप निंदनीय

(कै.) हनुमंतराव पवार, (कै.) सुभाषराव शिंदे यांनी कारखाना व दूध संघ चांगल्या पद्धतीने चालवला होता. त्यांच्याकडून हट्टाने कारखाना व दूध संघ काढून घेतला. प्रल्हाद साळुंखे पाटील यांच्याकडून साखरवाडीचा कारखाना काढून घेऊन त्याची विक्री दत्त इंडियाला केली. तालुक्यात गुंडशाही बोकाळत चालली आहे. पोलिस ठाण्यावर, अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. अशा लोकांनी पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप करणे निंदनीय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com