सातारकरांनाे... आता तुम्हांला कोरोनाचा अहवाल फटाफट समजणार, काळजी घेणेही साेपे झाले

सातारकरांनाे... आता तुम्हांला कोरोनाचा अहवाल फटाफट समजणार, काळजी घेणेही साेपे झाले
Updated on

सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयामध्ये रॅपीड ऍन्टीजेन चाचणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे बाधितांच्या निकटवर्तीयांचे अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. जिल्हा रुग्णालयात आणण्यात येणाऱ्या संशयितांना त्यामुळे फायदा होणार आहे. 
हवामानातील बदलातून 'हा' आला रोग 

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा वाढविण्यावर शासनाने भर दिलेला आहे. कोरोना विषाणू रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधितांच्या निकटवर्तीयांच्याही तपासण्या तातडीने कराव्यात लागतात. सुरवातीला जिल्ह्यामध्ये नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा नव्हती. सर्वांच्या नमुन्यासाठी केवळ पुण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. आता कृष्णा रुग्णालयात तपासणीची सोय झाली आहे. रुग्णांच्या स्क्रिनिंगसाठी जिल्हा रुग्णालयात ट्रूनॅट मशिनही बसविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील चाचणीची क्षमता वाढविण्यासाठी आरटी-पीसीआर लॅब मंजूर झाली आहे. त्यासाठी निधीही उपलब्ध झालेला आहे. ही लॅब लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाचण्यांची क्षमता वाढणार आहे. 

उदयनराजे भोसलेंनी घेतली खासदारकीची शपथ

प्रियजनांचे अंत्यदर्शन जगाच्या कानाकोपर्‍यातुन होण्यासाठी 'या' ट्रस्टचा पुढाकार

सध्या कोरोनाबाधित मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे तेवढ्याच संख्येत निकटवर्तीय वाढताहेत. त्यामुळे नमुन्यांचे प्रमाण जास्त झाले आहे. पुणे व कृष्णा रुग्णालयातील चाचणी सुविधेपेक्षाही मोठ्या संख्येने नमुने घ्यावे लागत आहेत. त्यामुळे नमुन्यांचे अहवाल येण्यासाठी काही वेळा विलंब होतो आहे. अशा परिस्थितीत लक्षणे असलेल्यांची तपासणी करून तातडीने अहवाल मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये रॅपीड ऍन्टीजेन चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या चाचणीचे तीन हजार किट जिल्ह्याला सध्या उपलब्ध झाले आहेत. या तपासणीचा अहवाल अर्ध्या तासामध्ये उपलब्ध होतो. त्यामुळे संशयिताला अन्य लोकांमधून तातडीने विलगीकरण करता येते. त्याचबरोबर त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरू केले जाणे शक्‍य होत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्‍यांमध्ये सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण सापडत आहे. त्या सर्वांच्या निकटच्या सहवासात असलेल्यांना विविध ठिकाणच्या कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यामध्ये लक्षणे असलेल्यांना जिल्हा रुग्णालयात किंवा त्या-त्या ठिकाणच्या रुग्णालयांत पाठविले जाते. जास्त आवश्‍यकता असेल तर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. अशा पद्धतीने आलेल्या तसेच थेट जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या व आवश्‍यकता असणाऱ्या संशयितांची तातडीने ऍन्टीजेन टेस्ट घेतली जाते. 

कोरोनामुळे शेळीपालक संकटात, बकरी ईद सणास बोकडांच्या मागणीत घट

विलगीकरण कक्ष कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन, जिल्ह्यातील या कोरोना सेंटरवर प्रकार

दिवसाला सुमारे 30 जणांच्या चाचण्या 

जिल्हा रुग्णालयात सध्या दिवसाला सरासरी 25 ते 30 जणांच्या अशा पद्धतीने चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे संशयित बाधित आहे की नाही, हे स्पष्ट होते. त्यानुसार त्याच्यावर तातडीने उपचार करता येणे शक्‍य झाले आहे. तसेच एखाद्याची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याला अन्य ठिकाणी उपचारासाठी जाता येणेही शक्‍य होणार आहे. 

कोरोनाच्या ‘या’ चाचण्यांचा उल्लेख तुम्ही ऐकला असेल , त्या चाचण्याविषयी जाणून घ्याच ...

Edited By : Siddharth Latkar

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.