दुर्मिळ 'ब्लॅक पँथर'चा ऐतिहासिक जावळी खोऱ्यात वावर

Black Panther
Black Pantheresakal
Updated on

कास (सातारा) : कुमठे (महाबळेश्वर) गाव ब्लॅक पँथरच्या (Black Panther) वावराने चर्चेत आलेला परिसर. हा परिसर शिवकालीन जावळी खोऱ्यात (Jawali Valley) मोडत असून आजूबाजूच्या प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांच्या जवळच आहे. घाटमाथा व कोकण (रायगड जिल्हा) भागात उतरणारा हातलोट घाट येथूनच जातो. याच अवघड हातलोट घाटात छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) कोकण जिंकायला निघालेले अनेक आदिलशाही, मोगली सरदार नेस्तनाबूत केले.

Summary

कुमठे (महाबळेश्वर) गाव ब्लॅक पँथरच्या (Black Panther) वावराने चर्चेत आलेला परिसर. हा परिसर शिवकालीन जावळी खोऱ्यात मोडत आहे.

कोकणला जोडणारा हा प्रदेश. मकरंद गडाच्या (Makarand Gad) पायथ्याशी हातलोट गाव आहे. हे शिवकालीन जावळी खोरे जैवविविधतेने नटलेला भाग. विपुल जंगल व प्राणी संपदा येथील संपत्ती. याच तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम कुमठे गाव ब्लॅक पँथरच्या दर्शनाने चर्चेत आले आहे. कुमठे गावाचा परिसर जंगल व निसर्ग संपदेने नटला आहे. या गावाच्या जवळच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा प्रतापगड आहे. कोयना नदीवर शिवाजी महाराजांनी बांधलेला व आजही सुस्थितीत असलेला शिवकालीन पूल चारशे वर्षांनंतर ही कोयनेचे अवखळ पाण्याला तोंड देत उभा आहे. जवळच मधू मकरंद गड आहे. उतेश्वराचे जागृत देवस्थान ही जवळच आहे. असा हा निसर्ग संपन्न व ऐतिहासिक पूर्वीच्या जावळी खोऱ्यातील प्रदेश. दुर्गम व निबीड नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमधे या भागाचा संपर्क तुटला होता.

Black Panther
कऱ्हाडातील विंग, पोतले, जखीणवाडीत बिबट्याची दहशत

चतुरबेट या ठिकाणी पूल वाहिला. रस्त्यावर दरडी कोसळल्या. निसर्गाच्या रौद्र रूपाने अनेक दिवस लोकांचा संपर्क तुटला, तो आजही सुस्थितीत झालेला नाही. ज्या अफजल खानाला मारण्यासाठी प्रतापगडचा परिसर राजांनी निवडला, त्याला कारण येथील जंगल व दुर्गमता. आज चारशे वर्षांनंतर ही बऱ्यापैकी टिकून आहे. वाघ, बिबट्या व इतर जंगली प्राण्यांचा वावर आजही ब्लॅक पँथरच्या रूपाने अस्तित्वात असल्याने ही संपदा टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत प्रयत्न होणे गरजेचे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()