साखर कारखान्यांकडून वीजबिले वसूल करा; रामराजे निंबाळकर

महावितरणला सूचना; शेतकऱ्यांनीही संमती पत्र द्यावीत
वीजबिले
वीजबिलेsakal
Updated on

फलटण शहर : थकीत वीजबिलप्रकरणी महावितरणने (msdecl)शेतकऱ्यांची वीज कनेक्शन(eletricity conection) कट करण्यात येत आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी शेतकरी ज्या कारखान्यांना ऊस घालतात. त्या कारखान्यांच्या माध्यमातून महावितरणने बिले वसूल करावीत, अशी सूचना करण्याबरोबरच शेतकऱ्यांनीही कारखान्यांना तसे संमती पत्र देऊन सहकार्य करावे, असे आवाहन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर(ramraje naik nimbalkar) यांनी केले.पंचायत समितीच्या सभागृहात रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजिली होती. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, प्रतिभा धुमाळ, महावितरणचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील बावडे, साताऱ्याचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, फलटणचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर आदींची या वेळी उपस्थिती होती.

वीजबिले
नांदेड : ‘पाणी वाचवा’ उपक्रमाला हरताळ...

फलटण तालुक्यात ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांची वीज महावितरणने कट केली, तर त्यास आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल. त्यामुळे आपणास ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची वीजबिले कारखान्यांनी महावितरणला भरावीत. यासाठी शेतकऱ्यांची संमती आवश्यक असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्याला तसे संमती पत्र देऊन सहकार्य करणे गरजेचे आहे, असे रामराजे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना वीजबिल हे भरावेत लागणार आहेत. आगामी काळात कारखान्याच्या माध्यमातून वीजबिले भरली गेली, तर शेतकऱ्यांवर वीज कट करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संमती द्यावी, असे संजीवराजे निंबाळकर यांनी सांगितले. या वेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सभागृहामध्ये मांडल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश रामराजे निंबाळकर यांनी संबंधितांना दिले.

वीजबिले
नांदेड : अर्धापूर नगरपंचायतीचा प्रचार शिगेला

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ उठवावा

फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एक दिवस एक गाव ही योजना राबविण्यात येणार आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांच्या आदेशानुसार आगामी काळामध्ये ऊसउत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे वीजबिल हे संबंधित कारखान्याच्या माध्यमातून भरण्याची सोयही करण्यात येणार आहे. जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ उठवावा, असे आवाहन बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील बावडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.