सातारा : जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं चांगलाच जोर धरला असून आज आणि उद्या सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आज जिल्ह्यात (बुधवार) सरासरी एकूण 19.8 मिलीमीटर पाऊस पडला असून आत्तापर्यंत सरासरी 119.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. (Red Alert Issued By Meteorological Department In Satara District Today And Tomorrow bam92)
जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं चांगलाच जोर धरला असून आज आणि उद्या सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज सकाळपासून सातारा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. कोयना, मोरणा, महाबळेश्वर, कऱ्हाड परिसरात मुसळधार सरींची बरसात होत आहे. जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आत्तापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 23.3 (91.7) मि. मी., जावळी- 47(154.8) मि.मी., पाटण-35.0 (157.5) मि.मी., कराड-14.0(75.0) मि.मी., कोरेगाव-9.7 (84.7) मि.मी., खटाव-7.8 (46.0) मि.मी., माण- 3.6 (118.3) मि.मी., फलटण- 0.7 (65.4) मि.मी., खंडाळा- 2.7 (45.0) मि.मी., वाई-18.3 (120.4) मि.मी., महाबळेश्वर-85.6 (636.3) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
देशभरात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सध्या हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणसह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या मुंबई केंद्रानुसार, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
'मोरणा'चे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलले
मोरगिरी (सातारा) : मोरणा गुरेघर धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाज्यातून २०४० क्यूसेस पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मोरणा नदीच्या काठावरील गावातील सर्व लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता सागर खरात आणि शाखा अभियंता खांडेकर यांनी संयुक्तपणे दिली.
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला
कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेमध्ये वाढ होत असल्याने २४ तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा अडीच टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणात ५५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाचा जोर कायमच आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ६५, नवजा ९५, तर महाबळेश्वर येथे ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायमच आहे. धरणाची जलपातळी २१११३ फूट झाली असून, धरणात ५५.०७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर धरण पूर्ण क्षमतेने भरून जलपातळी नियंत्रित करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडण्याची शक्यता आहे.
Red Alert Issued By Meteorological Department In Satara District Today And Tomorrow bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.