Prithviraj Chavan : आरक्षणाचे प्रश्न रस्त्यावर उतरुन सुटत नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांचा भुजबळांना टोला

भुजबळ शासनात असतील, शासनाच्या बाहेर असतील त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे
Prithviraj Chavan
Prithviraj Chavanesakal
Updated on

कऱ्हाड ः शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे काय बोलणे झाले, याची माहिती मला नाही. मात्र महाराष्ट्रात जो जातीय संघर्ष निर्माण होत आहे तो थांबवायचा प्रयत्न झाला पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न रस्त्यावर उतरुन सुटत नाहीत. भुजबळ शासनात असतील, शासनाच्या बाहेर असतील त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे, ही महाराष्ट्राची प्रकृती नाही अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सुनावले.

Prithviraj Chavan
Nashik Bribe Crime News : कारागृहाच्या दोघा लाचखोर डॉक्टरांना पोलीस कोठडी

कऱ्हाडला (जि.सातारा) जेष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पुतळा अनावरण आणि कोयना बॅंकेच्या इमारत उदघाटनानंतर माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. कॉग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षासंदर्भातील आश्वासन दिले आहे, त्यातुन तो प्रश्न सुटेल असा विश्वास ठेवला पाहिजे. मुख्यमंत्री काय तोडगा काढत आहेत ते समजल्यावर त्यावर भाष्य करता येईल. जातीय सलोखा राखण्याचे काम सरकारचे आहे, त्याला सर्वांचा पाठिंबा असेल. मात्र अशा प्रकारचे प्रश्न रस्त्यावर उतरुन सुटत नाहीत. भुजबळ शासनात असतील, शासनाच्या बाहेर असतील त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे ही महाराष्ट्राची प्रकृती नाही. शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे काय बोलणे झाले, याची माहिती मला नाही. मात्र महाराष्ट्रात जो जातीय संघर्ष निर्माण होत आहे तो थांबवायचा प्रयत्न झाला पाहिजे. छगन भुजबळ काय करत आहेत हे राज्याने पाहिले आहे. आता शांतता झाली पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरुन तो प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. ते काय करत आहेत त्यावर पुढील दिशा ठरेल.

हंडोरेंच्यावेळीच कारवाई व्हायला हवी होती

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काय घडले त्याची कॉंग्रेसकडुन चौकशी करुन बाळासाहेब थोरात यांच्याकडुन पक्ष श्रेष्ठींना दिला आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल असे सांगुण आमदार चव्हाण म्हणाले, कोणावरही काहीही आरोप करु नये. ज्यांचे नाव घेतले जाते त्यांच्यावर कारवाई झाली तर सांगावे. जो दणदणीत विजय झाला सांगतीले जाते ते बरोबर नाही. आम्ही दोन उमेदवार उभे केले असते तर बिनविरोध निवडणुक झाली असती. मात्र आम्ही मुद्दाम तीन उमेदवार उभे करुन तीन घटकांना न्याय दिला. आमची काही मते फुटली. जयंत पाटील यांनाही अपेक्षीत असलेली मते मिळाली नाहीत. काही मतांवर आमचा विश्वास होता. मात्र ते आले नाहीत. त्यांचा अहवाल श्रेष्ठींकडे पाठवला आहे. चंद्रकांत हंडोरेंच्यावेळीही असे झाले होते. त्यावेळी कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.