शेतीपंपांची वीज कनेक्शन तोडू नयेत; खंडाळा पंचायत समितीच्या सभेत ठराव

वीजबिले थकली म्हणून वीज वितरण कंपनीने शेतीपंपांचे वीजजोड कट करण्याचा धडका लावला आहे.
Electricity-Cutting
Electricity-Cuttingsakal
Updated on
Summary

वीजबिले थकली म्हणून वीज वितरण कंपनीने शेतीपंपांचे वीजजोड कट करण्याचा धडका लावला आहे.

लोणंद - अवकाळी पावसाने (Rain) शेतपिकांचे मोठे नुकसान (Agriculture Pump Loss) झाले आहे. रोजच्या खर्चाची हातमिळवणी करताना शेतकरी (Farmer) मेटाकुटीला आला आहे. त्यातून वीजबिले थकली (Electricity Bill Arrears) म्हणून वीज वितरण कंपनीने शेतीपंपांचे वीजजोड कट (Cutting) करण्याचा धडका लावला आहे. परिणामी, शेतकऱ्यांपुढील अडचणी (Problem) वाढत आहेत. थकीत वीजबिले भरण्याचा तगादा लाऊ नये, त्या भागातील ट्रान्स्‍फॉर्मर बंद न ठेवता म्‍हणून व्यक्‍तिगत पातळीवर कारवाई करावी, अशा मागणीचा ठराव खंडाळा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला.

अध्यक्षस्थानी नूतन सभापती अश्वीनीताई अश्विनीताई पवार होत्या. त्यावेळी उपसभापती वंदनाताई धायगुडे-पाटील, सदस्य राजेंद्र तांबे, मकरंद मोटे, चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम राबवण्यासंर्दभात कऱ्हाड नगरपालिकेशी संपर्क साधून खर्चाबाबत अंदाज घेण्याची सूचना सदस्य राजेंद्र तांबे व मकरंद मोटे यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून कऱ्हाड पालिकेशी संपर्क केला असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. धोम-बलकवडी धरणातील पाणी मागणी झाल्याशिवाय कालव्यात न सोडण्याची दक्षता घेण्याचेही सूचना सदस्यांनी केली.

Electricity-Cutting
नागठाण्यात आंदोलनातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

खंडाळा ग्रामीण रुग्णालयात ट्रामा सेंटर उभारण्यासाठीचा १४.९७ कोटींच्या खर्चाच्या पुनर्प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. २४ ते २९ जानेवारीदरम्यान जिल्हा परिषद गटनिहाय महिला बचत गटांचे अधिवेशन घेण्याचे आदेश आहेत. त्याप्रमाणे खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक, भादे व शिरवळ या तीन गटांत महिलांची अधिवेशने घेण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका बचत गट विभागाचे अधिकारी प्रवीण खुडे यांनी दिली.

मदतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : पवार

कोरोनामुळे आई-वडील मृत पावलेल्या १८ वर्षांखालील मुलांना शासनाकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जात आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त मुलांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. कोविडमुळे मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही शासन स्तरावरून जाहीर करण्यात आले आहे. अशा कुटुंबांच्या मदतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही अश्विनीताई पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.