थर्टी फर्स्टच्या उत्साहास लगाम; सातारा जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टाॅरंट, ढाब्यांना वेळेची मर्यादा

थर्टी फर्स्टच्या उत्साहास लगाम; सातारा जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टाॅरंट, ढाब्यांना वेळेची मर्यादा
Updated on

सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सरत्या वर्षाला निराेप देताना आणि नवीन वर्षाच्या स्वागत करताना व्यावसायिकांसह नागरिकांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संचारबंदी लागू असल्याने सातारा जिल्ह्यात थर्टी फर्स्ट रात्र अकरा वाजेपर्यंतच साजरा करता येणार आहे. दरम्यान 31 डिसेंबरला हॉटेल, रेस्टाॅरंट, ढाबे अकरा वाजता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकतेच काढले आहेत. 

सातारा जिल्ह्यात सध्या 50 च्या आसपास नागरिक काेराेनाबाधित आढळत आहेत. ही संख्या कमी असली तरी जिल्ह्यातील काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख यात्रा स्थानिकांच्या सहकार्याने साध्या पद्धतीने साज-या हाेतील असे नियाेजन केले. त्यास ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी सकरात्मक प्रतिसाद दिला.

दे त्यांना काय पाहिजे ते! कार्यकर्त्यांसाठी पुढा-यांचे ढाब्यावर वाढले फाेन

आता थर्टी फर्स्ट अर्थाच सरत्या वर्षाला निराेप देण्यासाठी युवा वर्गाचा उत्साह लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच एक जानेवारीच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच साजरे करावे असेही आवाहनही केले आले आहे. जिल्ह्यातील सर्व शहरातील दुकानांसाठी रात्री नऊपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर दुकान उघडे ठेवल्यास कारवाई केली जाणार आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे यांच्यासोबत रेस्टॉरंट अॅन्ड  बार असलेल्यांना मर्यादा आल्या आहेत. रेस्टाॅरंट अॅन्ड बार हे पुर्वीप्रमाणेच खूले राहतील. अन्य गाेष्टी या रात्री अकरा पर्यंत सुरु राहणार आहेत. 

सातारा : 'थर्टी फर्स्ट'च्या सेलिब्रेशनची गावा गावांत तयारी; भजन, कीर्तनाचेही उपक्रम

या आदेशामधून राष्ट्रीय महामार्गावर असणारे हॉटेल, रेस्टॉरंट धाबे यांना वगळण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित हॉटेल, रेस्टॉरंट ढाबे सात दिवस बंद करुन त्यांचे विरुध्द दंडात्मक तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान आज (31 डिसेंबर) साजरा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी पर्यटनस्थळावर पर्यटक माेठ्या संख्येने आलेले आहेत. कोविडच्या अनुषंगाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी आज सर्व कार्यक्रमांना रात्री दहा वाजल्यानंतर चालू ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधिताविरुध्द दंडात्मक तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले.

नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर

याबराेबरच नव्या वर्षात मंदिरात अथवा विविध धार्मिकस्थळांवर नागरिक जातात. या ठिकाणी 60 वर्षांवरील तसेच 10 वर्षांखालील भाविकांना मंदिरात जाऊन दर्शनास बंदी करण्यात आली आहे. भाविकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे याची खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

आता १५ दिवसांत दंड भरा नाहीतर, थेट कोर्टाची पायरी चढा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.