Khambatki Tunnel : पुण्यातील युवकाचा मृतदेह खंबाटकी बोगद्याजवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला; पाच दिवस सुरू होता कसून शोध

अपघात (Road Accident) होऊन ध्रुवचा मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
Dhruv Swapnil Sonawane Khambatki Tunnel
Dhruv Swapnil Sonawane Khambatki Tunnelesakal
Updated on
Summary

ध्रुव याचे लोकेशन रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा, भोळी (ता. खंडाळा) व वाई असे दिसत होते. मात्र, रविवारी सायंकाळपासून लोकेशन मिळत नव्हते.

खंडाळा : खंबाटकी बोगद्यानंतरच्या (Khambatki Tunnel) वळणावरील नाल्यात बावधन (पुणे) येथील युवकाचा मृतदेह आढळून आला. ध्रुव स्वप्नील सोनावणे (वय १८, रा. बावधन, पुणे) असे त्याचे नाव असून, तो रविवारपासून (ता. १७) घरातून निघून गेला होता.

Dhruv Swapnil Sonawane Khambatki Tunnel
Devgad Crime : ऐन गणेशोत्सवात कोकण हादरलं! खून झालेल्या प्रसादच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, मिठबांवात खळबळ

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्याच वळणावर ध्रुव सोनावणे हा दुचाकीसह (एमएच १२ व्हीयु ०८७८) नाल्यांमध्ये पडला होता. मात्र, झाडी व गवतामुळे तो कोणाच्याही निर्देशनास आला नाही. रस्त्यालगतची झुडपे काढताना त्याची दुचाकी दिसून आल्याने शोध घेतला असता ध्रुव सोनावणे याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.

या वेळी घटनास्थळी खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व खंडाळ्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व पोलिसांनी भेट दिली. अपघात (Road Accident) होऊन ध्रुव याचा मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Dhruv Swapnil Sonawane Khambatki Tunnel
Sadabhau Khot : 'दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले, आता त्यांनी पैरा फेडावा'

ध्रुव याचे आई-वडील व आजी हे अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले असता तो बावधन येथील घरी एकटाच होता. रविवारी सकाळी ध्रुव याच्या आत्याने चौकशी केली असता, तो घरी नसल्याचे कळाले. सीसीटीव्हीद्वारे तो रात्रीच १२:४८ मिनिटांनी घर सोडून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांमध्ये नोंदविली.

Dhruv Swapnil Sonawane Khambatki Tunnel
Sharad Ponkshe : 'बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता'

ध्रुव याचे लोकेशन रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा, भोळी (ता. खंडाळा) व वाई असे दिसत होते. मात्र, रविवारी सायंकाळपासून लोकेशन मिळत नव्हते. दरम्यान ध्रुव याचे वडील व नातेवाईक या परिसरात गेले पाच दिवस कसून शोध घेत होते. या घटनेची खंडाळा पोलिसात (Khandala Police) नोंद झाली असून, पुढील तपास श्री. पोळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.