वडूज : बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीवर पाळत ठेऊन त्याला गावाबाहेर आडमार्गावर गाठायचे. पोलिस असल्याचे सांगून तेथून ये- जा करणाऱ्या अन्य व्यक्तीला दरडावून त्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम रुमालात बांधून पुन्हा त्याच्याच ताब्यात द्यायचे अन् पाळत ठेवलेल्या व्यक्तीचे दागिने,
रोख रक्कम अशाच प्रकारे रुमालात बांधून देण्याचा बहाणा व हातचलाखी करीत लंपास करायचे, असा फंडा आता चोरट्यांनी आत्मसात केला आहे. वृद्धांसमोर जणू, तू चोर.. मैं सिपाही अशा अविर्भावात वावरणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलिस असल्याचे सांगून येथील कांदा, बटाट्याचे प्रतिष्ठित व्यापारी प्रकाश बनकर यांना हिंगणे रस्त्यावर सौभाग्य कार्यालयाजवळ बुधवारी (ता. २२) साडेदहा तोळ्यांचे सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे दागिन्यांसह लुटले. उंबर्डे येथील चंदू पवार यांनाही वडूज- कऱ्हाड रस्त्यावर शिवाजीनगर येथे लुटल्याची घटना घडली.
दहिवडी (ता. माण) येथील विश्वास जाधव यांनाही अशाच प्रकारे लुटले होते. या घटनांचा अभ्यास केल्यास किमान आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असलेल्या व्यक्तीची हेरगिरी करणे, त्यावर पाळत ठेवणे, त्याच्या घराकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच त्याला आडमार्गात गाठणे, त्याच्या समोर अन्य अज्ञाताला बोलावून पोलिस असल्याचे सांगत त्याचे दागिने रूमालात बांधून देणे,
त्या वेळी सावज केलेल्या संबंधित व्यक्तीचे दागिने काढून ते रूमालात बांधून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करीत ते लांबविणे, असे साम्य या घटनांत दआडमार्गावर अशा घटना घडल्याने त्याठिकाणी अचानकपणे मदतीला येणारेही कोणी दिसत नाही की कुठे सीसीटीव्ही आढळत नाही. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे.
श्री. बनकर यांना लुटल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या वेळी अज्ञात दोन जण दुचाकीवरून श्री. बनकर यांच्या पाळतीवर मागोमाग असल्याचे दिसून येते.
घटना घडल्यानंतर काही क्षणांत परत दुचाकीवरून धूम ठोकल्याचे दिसून येते. त्यामुळेच अशा घटना या पाळत ठेवूनच केल्या जात असल्याचे स्पष्ट होते. वयोवृद्ध नागरिकांना आडमार्गी रस्त्यावर एकटे गाठून लूट करणारी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे.
आपल्याच अन्य सहकाऱ्याला पुढे पाठवून त्यांच्यासमोर अनभिज्ञपणाने बोलावून घ्यायचे, पोलिस असल्याचे सांगून पुढे चेकिंग सुरू असल्याची बतावणी करायची. त्यांच्यासमोर दागिने, रोख रक्कम आदी ऐवज काढायला लावून तो त्याच्याच रूमालात परत बांधून द्यायचा. याच पद्धतीचा अवलंब संबंधित वृद्धावर करीत हातचलाखी करीत त्याचे दागिने आदी ऐवज लांबवण्याची कार्यपद्धती असल्याचे दिसते.
वाहनांचीही तपासणी..?
गुरुवारी (ता. २३) कऱ्हाड रस्त्यावर हॉटेल ब्लू डायमंड जवळ पोलिस अधिकारी असल्याचे सांगून रस्त्यावर ये- जा करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे तपासणी करणाऱ्या संशयित पोलिस अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून अशा लुटारू टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.