'राष्ट्रवादी'ला रोखण्यासाठी राजेंच्या भूमिकेवर 'भाजप'ची मदार

दोन खासदार, दोन आमदारांसह एक नेता इच्छुक; दोन दिवसांत बैठक होऊन ठरणार रणनीती
Udayanraje-Shivendrasinghraje
Udayanraje-Shivendrasinghrajeesakal
Updated on

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या (Satara Bank Election) निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) विरोध करून भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) आपली ताकद दाखविण्याची संधी आलेली आहे. यामध्ये साताऱ्यातील दोन राजेंची भूमिका महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. या दोन्ही राजेंच्या पुढाकारातून जिल्हा बॅंकेची रणनीती ठरविण्यासाठी भाजपची येत्या दोन दिवसांत बैठक होणार आहे. सध्या तरी बॅंकेवर संचालक होण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale), आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांच्यासोबतच कऱ्हाड दक्षिण सोसायटी मतदारसंघातून अतुल भोसले (Atul Bhosale), खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनीही तयारी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे पॅनेल (BJP Panel) उभे राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Summary

भाजपने आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी राहणार नाही.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीस अखेर मुहूर्त लागला आहे. सध्या कच्ची मतदार यादी प्रसिध्दीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष कोणाकोणाची पॅनेल उभी राहणार, याकडे लागले आहे. जिल्हा बॅंकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी बॅंकेच्या विविध मतदारसंघांतील सर्वाधिक मते भाजपचे आमदार व विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहेत. त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक सोपी करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे. पण, भाजपच्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची भूमिका ही राष्ट्रवादीविरोधी आहे. त्यामुळे यावेळेस जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपला आपली ताकद दाखविण्याची संधी आलेली आहे. या संधीचे सोने करताना सर्व नेत्यांची वज्रमूठ बांधण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. त्यामुळे सर्वांच्या एकीतून भाजपचे नेते राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करू शकतात.

Udayanraje-Shivendrasinghraje
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करणार

पण, अद्याप तरी आमदार भोसले, आमदार गोरे, खासदार भोसले व अतुल भोसले या चार जणांनी आपापल्या नावांचे ठराव करून पहिले पाऊल टाकले आहे. त्यांना आता उर्वरित मतदारसंघांसाठीची जमावाजमव करावी लागणार आहे. आमदार भोसले यांच्या विचारांचे पाच संचालक आहेत. त्यामुळे त्यांची ताकद ओळखून राष्ट्रवादीने त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक सर्वसमावेशक पध्दतीने बिनविरोध करण्याच्या तयारीत राष्ट्रवादीचे नेते आहेत. पण, भाजपनेही आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी राहणार नाही. पण, त्यांची सर्व गणिते खासदार भोसले व आमदार भोसले यांच्यावर अवलंबून आहेत. सातारच्या दोन्ही राजेंनी तटस्थ भूमिका घेत भाजपसोबत राहून स्वतंत्र पॅनेल टाकण्यासाठी मदत केली तर भाजप आपल्या विचाराचे किमान निम्मे संचालक जिल्हा बॅंकेत निवडून आणू शकते. त्यासाठी दोन्ही राजेंचे मन वळविण्याचे काम भाजपला करावे लागेल.

Udayanraje-Shivendrasinghraje
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला डावललं

दिग्गज नेते लक्ष घालणार

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. यामध्ये त्यांना यश आले तर भाजपचे पॅनेल जिल्हा बॅंकेत उभे राहू शकते. त्यासाठी येत्या दोन दिवसांत भाजपचे नेते एकत्र बसून रणनीती ठरविणार आहेत. त्यामध्ये दोन्ही राजांचे मन वळविण्यात यश आले तर राष्ट्रवादीला ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे.

Udayanraje-Shivendrasinghraje
जिल्हा बँकेसाठी 'सह्याद्री'वर खलबत्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()