गुलालाच्या उधळणीत घुमला रूपाली साबळेंचा जयघाेष

गुलालाच्या उधळणीत घुमला रूपाली साबळेंचा जयघाेष
Updated on

शिवथर (जि. सातारा) : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रूपाली प्रदीप साबळे यांची, तर उपसरपंचपदी सुनील शंकर साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे- पाटील यांच्या किसनराव साबळे- पाटील पॅनेलला आठ जागा मिळाल्या असून, तीन जागा भैरवनाथ ग्राम विकास पॅनेलला मिळाल्या आहेत. 

निवडीनंतर सरपंच रूपाली साबळे व उपसरपंच सुनील साबळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाकेच्या आतषबाजीत जल्लोष केला. सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांनी गावातून फेरी काढली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून भिसे, ग्राम विकास अधिकारी गोडसे यांनी काम पाहिले. 

साताऱ्याच्या पोरानं जिंकलं दिल्लीचं तख्त; यूपीएससीत प्रथमेश देशात तिसरा, तर महाराष्ट्रात पहिला!

या प्रसंगी किरण साबळे पाटील, माजी उपसरपंच प्रकाश साबळे, नवनाथ साबळे, प्रमोद साबळे, कालिदास साबळे, संजय साबळे, विलास साबळे, सुधीर साबळे, अशोक साबळे, देवानंद साबळे, जयवंत साबळे, लक्ष्मण साबळे, बाळासाहेब साबळे, पांडुरंग साबळे, ग्रामपंचायतीचे आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, सदस्य उपस्थित होते.

सहलीहून परतल्यानंतर 33 विद्यार्थी कोरोनाबाधित? युद्धपातळीवर उपाययाेजना सुरु

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()