Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये अडकले साताऱ्याचे 50 नागरिक

50 Satara citizens stranded in Ukraine
50 Satara citizens stranded in Ukraineesakal
Updated on
Summary

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध भडकले आहे.

सातारा : रशिया आणि युक्रेन (Russia And Ukraine War) यांच्यात युद्ध भडकले आहे. त्यामुळे शिक्षणासह नोकरी, व्यवसायानिमित्त तेथे असलेले इतर देशांतील नागरिकांनी स्वदेशी येण्यास सुरवात केली आहे. भारतातील लोकही मोठ्या संख्येने युक्रेनमध्ये आहेत. यातील सुमारे ५० नागरिक हे सातारा जिल्ह्यातील असल्याने त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाशी (India Government) तसेच दिल्लीतील नियंत्रण कक्षाशी संपर्क करून माहिती दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही सुरू केला आहे.

सध्या रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी नागरिकांच्या मदतीसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील काही नागरिक युक्रेनमध्ये अडकल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यांच्याशी संपर्क करून त्यांना भारतीय दूतावासाच्या मदतीने पुन्हा भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण, त्यात काही अडचणीही येत आहेत.

50 Satara citizens stranded in Ukraine
Russia-Ukraine War : 'काहीही करून आमची लवकर सुटका करा..'

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतची माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी नियंत्रण कक्ष सुरू केलेला आहे. युक्रेनमध्ये जिल्ह्यातील सुमारे ५० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनास तीन ते चार जणांची नावे समजली आहेत. त्यामध्ये राधिका संजय वाघमारे, अशुतोष राजेंद्र भुजबळ तसेच सुभाष रोहितकुमार व्दिवेदी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिल्लीतील नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवला आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले व खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनीही दिल्लीतील नियंत्रण कक्षाशी संपर्क करून युक्रेनमधील भारतीय नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी संपर्क केलेला आहे.

50 Satara citizens stranded in Ukraine
युक्रेनवरील हल्ला अन्यायकारक, संपूर्ण जग पाठिशी : शेन वॉर्न

नियंत्रण कक्षांशी संपर्क करावा

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साताऱ्यातील आणखी कोणी नागरिक अथवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले असतील तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षांशी संपर्क करावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे देविदास ताम्हाणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.