ओगलेवाडी (जि. सातारा) : हजारमाची येथील शिवकालीन ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटन योजनेतून शासनाने महत्त्वकांक्षी शिवसृष्टी प्रकल्प साकारण्याची मागणी परिसरातील सहा गावांतील ग्रामस्थांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली. नियोजित शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यासंबंधित शासन पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री पाटील व आमदार चव्हाण यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड असून, त्याचा वापर त्या काळात शत्रू टेहळणी नाका म्हणून केला जात असे. सदाशिवगडावर विस्तीर्ण पठार असून, ते वनविभागाच्या अखत्यारित आहे. शासनाच्या वनविभागाच्या माध्यमातून वनपर्यटन योजनेत सदाशिवगडाचा समावेश करून शिवसृष्टी प्रकल्प साकार करण्याची मागणी निवेदनाद्वारे परिसरातील हजारमाची, बाबरमाची, वनवासमाची, राजमाची, विरवडे व ओगलेवाडीच्या ग्रामस्थांनी केली.
अनाथ व मनोरुग्णांसाठी ‘यशोधन ट्रस्ट’
यावेळी सरपंच सुनीता कदम, उपसरपंच राहुल जांभळे, राजमाचीचे शिवाडी डुबल, सुमन घाडगे, वनवासमाचीचे महिपती माने, अधिक सुर्वे, ऍड. सी. बी. कदम, ऍड. दादासाहेब जाधव, शरद कदम, कल्याण डुबल, प्रशांत यादव, गणेश घबाडे, दीपक लिमकर, सतीश पवार, विकास सुर्वे, पराग रामुगडे, सर्जेराव पानवळ, बाबासाहेब पवार, कृष्णात काळे, शिवाजी डुबल, रामदास पवार आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर शासनाने शिवसृष्टी प्रकल्प साकारल्यास गडाच्या वैभवात व सौंदर्यात भर पडेल. त्यामुळे राज्यातील पर्यटक व भाविकांचे आकर्षणाचे केंद्र होईल. नव्या पिढीस गडसंवर्धनामुळे प्रेरणा व स्फूर्ती मिळणार आहे, असे हजारमाचीच्या सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव यांनी सांगितले.
कऱ्हाड, मलकापूरातील रुग्णालये ताब्यात घेणार : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.