Sahyadri Expres : सह्याद्री एक्सप्रेस पाच नोव्हेंबरपासून ट्रॅकवर; पुणे- कोल्हापूर धावणार

कोरोना काळात प्रवासी वहातूकीवर परिणाम होवुन सह्याद्रि एक्सप्रेस बंद झाली.
shyadri express
shyadri express sakal
Updated on

कऱ्हाड - कोल्हापुर ते मुंबई दरम्यान धावणारी सह्याद्री एक्सप्रेस कोरोना काळात बंद झाली. ती सुरु होण्यासाठी मध्‍य रेल्वेच्या पुणे विभागीय बैठकीत पश्चिम महाराष्‍ट्रातील खासदारांनी विशेषतः सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मागणी केली. त्यास रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ती एक्सप्रेस पुन्हा सुरू होत आहे. कोल्हापुर ते पुणे दरम्यान पाच नोव्हेंबरपासुन ही एक्सप्रेस पुन्हा पटरीवर येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी दिली.

कोरोना काळात प्रवासी वहातूकीवर परिणाम होवुन सह्याद्रि एक्सप्रेस बंद झाली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नागरिक नोगरीनिमित्त पुणे मुंबई वास्तव्यास आहेत. सणासुदीत बहुतांश नागरिक आप-आपल्या गावी परततात. त्यामुळे रस्त्यावरील वहातुकीवर मोठा ताण येतो. त्यातुन अपघातामध्‍येही वाढ होवुन अनेकांनी जिवास मुकावे लागते. त्यातच सध्या सातारा ते कागल दरम्यान महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे.

त्यामुळेही वाहतुकीचा ताण वाढणार आहे. त्याचा विचार करुन ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी मध्‍य रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या बैठकीमध्‍ये पश्चिम महाराष्‍ट्रातील खासदारांनी विशेषतः खासदार पाटील यांनी मागणी केली होती. त्यास रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत सह्याद्रि एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला. रेल्वे प्रशासनाने पाच नोव्हेंबरपासुन ती एक्सप्रेस कोल्हापुर पुणे दरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

shyadri express
Railway News: आनंदाची बातमी: सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा झाली सुरु!

अशा आहेत गाड्या सुटण्याच्या वेळा

कोल्हापूर-पुणे ही 01024 नंबरची गाडी रात्री 11:30 वाजता कोल्हापूरहून निघणार आहे. ती दुसऱ्या दिवशी सकाळी 7:45 वाजता पुणे येथे पोहचेल. पुणे-कोल्हापूर ही 01023 नंबरची गाडी रोज रात्री 9:45 वाजता पुण्‍याहून कोल्हापूरसाठी निघेल आणि पहाटे 5:40 वाजता कोल्हापूरला पोहचेल. ऐन दिवाळीच्या काळात सदर गाड्या सुरू केल्यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

shyadri express
Railway Recruitment : बारावीनंतर रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ग्रुप 'क' आणि 'ड'साठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

येथे मिळतील थांबे

सह्याद्री एक्सप्रेसला कोल्हापूर, वाळीवडे, रूकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कऱ्हाड, मसूर, तारगांव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, वाठार, लोणंद, निरा, जेजूरी पुणे येथे थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गावातील व परिसरातील प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.