कोयनानगर (जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सुरू केलेली शामा प्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत सवलतीची घरगुती गॅस योजना वन्यजीव विभागाने बंद केली असून, ग्रामस्थांवर जाचक अटी व बंधने लादण्याचे काम सुरू केले आहे. या धोरणाच्या विरोधात रासाटी येथील कुंभार कुटुंबीय मंगळवारी (ता. नऊ) ग्रामपंचायतीसमोर "चुलीवरचे जेवण' हे अभिनव आंदोलन करणार असल्याची माहिती अमिषा कुंभार यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.
दोन वर्षांपासून रासाटीतील नागरिकांना सवलतीच्या दरात घरगुती गॅस देण्यात येत होते. यामुळे ग्रामस्थ समाधानी होते. मात्र, तीन महिन्यांपासून योजना बंद झाल्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. वन्यजीव विभागाच्या सर्व अटी मान्य करूनही रासाटी ग्रामपंचायतीची अवस्था "आ बैल मुझे मार' अशी झाली आहे. निधीअभावी योजना अनेक महिने बंद आहे.
गॅस नसताना जळण गोळा करण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू असली, तरी वन्यजीव विभागाने कुऱ्हाडबंदी व जाचक अटी घातल्या आहेत. यामुळे मेटाकुटीला आलेल्या कुंभार कुटुंबीयांनी याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी चुलीवरचे जेवण करण्याचे आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
जाणून घ्या काेणत्या गावांची सरपंच निवड लांबणीवर गेली आहे
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.