'त्या' कृषी दुकानांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू

Sajid Mulla
Sajid Mullaesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : बोगस बियाणे आणि वाढीव दराने रासायनिक खतांची (Chemical fertilizer) विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील कृषी दुकानांवर भरारी पथकांद्वारे कारवाई करावी, अन्यथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agriculture Officer) यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे (Baliraja Farmers Association) जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला (Sajid Mulla) यांनी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांना देण्यात आले. (Sajid Mulla Demand Action Against Shops Selling Chemical Fertilizers At Increased Rates)

Summary

कोरोना काळातील लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निवेदनातील माहिती अशी, कोरोना काळातील लॉकडाउनमुळे (Lockdown) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग चालू झाली आहे. शेतकरी (Farmers) कृ़षी दुकानांमध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा, पाटण, फलटण, वाई, माण, खटाव आदी तालुक्यांतील काही विक्रेते बोगस बियाणे आणि चढ्या भावाने खतांची विक्री करत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत.

Sajid Mulla
पवारांचा कथित राजीनामा माझ्यापर्यंत आलाच नाही

प्रत्येक तालुक्यात प्रशासनामार्फत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परंतु, या पथकांमार्फत कोणतीही अपवाद सोडला तर कारवाई होताना दिसत नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील बोगस बियाणे, वाढीव दराने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर भरारी पथकांव्दारे कारवाई करावी, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या सातारा येथील कार्यालयाला टाळे ठोकेल, असा इशारा श्री. मुल्ला यांनी दिला आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नजीर पटेल, प्रकाश पाटील, सुनील कोळी व शेतकरी उपस्थित होते.

Sajid Mulla Demand Action Against Shops Selling Chemical Fertilizers At Increased Rates

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()