Sakal Impat: पुणे- बंगळुर महामार्गावरील 'त्या' पुलाचा धोका टळला; भराव काढला, पाण्याचा वेग झाला कमी

Satara: पुलाच्या उभारणीसाठी नदीपात्राच्या पूर्व आणि पश्चिमेकडील अशा दोन्ही बाजूकडून भराव टाकण्यात आला होता.
Sakal Impat: पुणे- बंगळुर महामार्गावरील 'त्या' पुलाचा धोका टळला; भराव काढला, पाण्याचा वेग झाला कमी
Updated on

Karhad: पुणे- बंगळूर महामार्गावरील कोयना पुलाच्या जवळच नवीन दुसरा पूल उभारणीचे काम महामार्ग विभागांतर्गत ठेकेदार कंपनीकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्या पुलाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पुलाच्या उभारणीसाठी नदीपात्राच्या पूर्व आणि पश्चिमेकडील अशा दोन्ही बाजूकडून भराव टाकण्यात आला होता.

Sakal Impat: पुणे- बंगळुर महामार्गावरील 'त्या' पुलाचा धोका टळला; भराव काढला, पाण्याचा वेग झाला कमी
Sassoon Hospital Pune: ससूनमध्ये धक्कादायक प्रकार! बेवारस रुग्णांसोबत डॉक्टरांचे अमानवी कृत्य; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

पात्रात भराव असल्याने नदीपात्रातून पुढे जाणाऱ्या पाण्याचा दाब हे पुलाच्या मोकळ्या असलेल्या मध्य भागातील दोनच खांबांवर येत होता. त्यातच सध्या पावसाळा सुरू झाल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने खांबाला धोका निर्माण झाला होता. त्याबाबत मोठा उठाव झाल्याने नदीपात्रातील भराव काढल्याने पुलाचा धोका टळला आहे.

पुणे- बंगळूर महामार्गावरील शेंद्रे ते कागल दरम्यानच्या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम महामार्ग विभागांतर्गत ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे. त्या अंतर्गत पुलांचीही कामेही हाती घेण्यात आली आहेत. येथील कोयना पुलाच्या शेजारीच दुसरा नवीन पूल वाहतुकीसाठी उभारणीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्या पुलाच्या उभारणीसाठी नदीपात्रात भराव टाकण्यात आला आहे.

Sakal Impat: पुणे- बंगळुर महामार्गावरील 'त्या' पुलाचा धोका टळला; भराव काढला, पाण्याचा वेग झाला कमी
Pune Sassoon Hospital: रुग्णाला निर्जनस्थळी नेऊन टाकणारा ससूनचा निर्दयी डॉक्टर निलंबित

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाणी जाण्यासाठी मोकळ्या ठेवलेल्या नदीपात्रातील दोन खांबांच्या मधूनच वाहत होते. त्यातच पावसाने नदीतील पाण्याची पातळी वाढून पाणीही दबावाने वाहत होते. त्यामुळे त्या खांबांला काही धोका निर्माण झाला होता. त्यासंदर्भात दैनिक ‘सकाळ’ने आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन ठेकेदार कंपनीने नदीपात्राच्या दोन्ही बाजूला टाकलेला भराव काढण्याची कार्यवाही केली आहे. त्यामुळे पिलरला होणारा धोका टळला आहे. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Sakal Impat: पुणे- बंगळुर महामार्गावरील 'त्या' पुलाचा धोका टळला; भराव काढला, पाण्याचा वेग झाला कमी
Pune: सिंहगड रस्त्यावरुन प्रवास करताना सावधान, सिमेंट काँक्रिट सांडल्याने होता आहेत अपघात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.