सातारा : साक्षे... अगं चार दिवस थांब की... आपली परिस्थिती न्हाय... मोलमजुरी मिळाली की तुला मोबाईल घेते... जरा कळ काड...पण, साक्षी थांबली न्हाई.... साक्षे.. साक्षे...! अशा शब्दांत साक्षीची आई स्वाती पोळ यांनी फोडलेला हंबरडा साऱ्यांचे हृदय पिळवटून गेला.
ओंड (ता. कऱ्हाड) या गावात दहावीत शिकणाऱ्या साक्षी या विद्यार्थिनीला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल मिळू शकला नाही. त्यामुळे अभ्यास होत नाही, या तणावातून आई शेतात जाताच तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. साक्षीच्या घरची परिस्थिती अगदीच नाजूक. वडील आबासाहेब पोळ यांचे निधन झाल्याने आई स्वाती या मोलमजुरी करून मुलीला शिक्षण देत होत्या. साक्षी अभ्यासात हुशार. परिस्थिती गरीब असल्याने शिक्षकही साक्षीला शिक्षणात मदत कशी होईल, हे पाहात असत. पण, साक्षीच्या आईला मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता.
कऱ्हाडात मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा
कोरोना संसर्गाच्या भीतीने सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, त्यासाठी किमान चांगला मोबाईल विद्यार्थ्यांकडे असण्याची गरज आहे. मोबाईल नसल्याने हुशार असूनही साक्षीचा अभ्यास होत नव्हता. अभ्यास होत नसल्याची खंत साक्षीला सतत बोचत होती. आईकडे ती सारखी मोबाईल घेण्याचा आग्रह धरत होती. "मम्मे... मला मोबाईल घे की गं...' अशी ती आईला सतत म्हणायची. मात्र, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या साक्षीच्या आईला तातडीने मोबाईल घेणे शक्य होत नव्हते. "थोडं दिवस थांब. चार दिवस मोलमजुरी मिळाली की घीवू' अशी त्या साक्षीची समजूत घालायच्या. मात्र, साक्षीची शिक्षण घेण्याची तगमग वाढत होती.
स्कूल बसचालकांचे कर माफ करा, अन्यथा आंदोलन : राज्य महासंघाचा इशारा
साक्षीची आई शेतातून आल्यानंतर रेशनिंग आणून धान्य निवडत होत्या. साक्षीही त्यांना मदत करत होती. तेव्हाही साक्षी आईला "मम्मे, मला मोबाईल घे की गं. माझा अभ्यास हुईना' असं आर्जव करत होती. "जरा मोलमजुरी मिळाल्यावर घीवू गं', अशा शब्दांत त्यांनी साक्षीची समजूत काढली अन् मक्याची कणसं आणायला त्या शिवारात गेल्या आणि फक्त अर्ध्या तासातच परत आल्या. घराचे दार उघडून आत गेल्या अन् घरातील दृष्य पाहून त्यांच्यावर कुऱ्हाड कोसळली. निरागस साक्षीने घरात गळफास घेतला होता.
ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
ते पाहताच साक्षीच्या आईने "साक्षे.. साक्षे.. काय केलंस हे...' असं म्हणत फोडलेला हंबरडा साऱ्यांना अंतर्मुख करून गेला. केवळ ओंड गावच नव्हे, तर अभ्यास न होण्याच्या तगमगीतून बळी गेलेल्या साक्षीसाठी सारे जण गदगदून गेले.
अपहरण झालेल्या बाळाच्या शोधार्थ 22 प्रमुख अधिका-यांची 12 पथके; अधीक्षक सातपुतेंचे नागरिकांना आवाहन
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.