गोडोली (जि. सातारा) : समर्थनगर (सातारा) येथील सरपंच नवाज मुस्ताक बसीर सय्यद यांनी कोंडवे व समर्थनगर येथील दोन ठिकाणचे मतदान ओळखपत्र मिळवून समर्थनगर येथील सरपंचपद मिळविले. दोन ठिकाणचे ओळखत्र मिळविणे, हा गुन्हा असल्याने सरपंचपदाच्या प्रतिस्पर्धी असलेल्या शुभांगी डोरले यांना सरपंचपदापसून बाजूला केले. त्यामुळे सरपंचांच्या फसवणुकीबद्दल अनिल कदम, शुभांगी डोरले, हणमंत पवार व इतर ६० ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व निवडणूक आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. (samarthnagar-sarpanch-has-two-voting-id-cards-complaints-villagers-satara-marathi-news)
सातारा शहरालगत समर्थनगरचे सरपंच नवाज मुस्ताक बसीर सय्यद हे जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. सरपंचपद ओबीसीसाठी आरक्षित होते. त्यामुळे सय्यद यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांचे प्रतिस्पर्धी शुभांगी डोरले यांनीही अर्ज केला होता. गुप्त मतदान पद्धतीत सय्यद विजयी झाले. मात्र, दोन ठिकाणी मतदान ओळखपत्र असल्याचे त्यांनी लपवून ठेवले.
श्री. सय्यद हे कोंडवे गावचे कायमचे रहिवाशी आहेत. त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक एन. आर. टी. ७२४४६८४ असा आहे व यादीत नवाज मुस्ताक बसीर सय्यद असे नाव आहे. सय्यद हे कोंडवे येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतात. समर्थनगरमधील मतदार ओळखपत्र क्रं. एम. के. क्यु. ०२६९३२१६ असा आहे. सातारा व कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सय्यद यांनी स्वतःचे नाव नोंदवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे, अशी तक्रार ग्रामस्थांची आहे.
त्यामुळे समर्थनगर ग्रामपंचायत सदस्यपद व सरपंचपद रद्द करण्यासंदर्भात अनिल कदम, शुभांगी डोरले, हणमंत पवार, हेमंत देशमुख, प्रवीण देशमुख व इतर साठ ग्रामस्थांनी निवडणूक आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.