वारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यानेच भिडे गुरूजी भेटीला

Sambhaji Bhide
Sambhaji Bhideesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने (Maharashtra Government) देहूमध्ये वारकऱ्यांचे (Ashadhi Ekadashi Wari) आंदोलन राक्षसी पद्धतीने मोडीत काढून मला गाडीत घालून करवडीत आणले. येथे २० जुलैपर्यंत स्थानबद्ध केले आहे. वारकऱ्यांवरील झालेला अन्याय योग्य नसल्याची समाजभावना आहे. त्याच भावनेतून शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे गुरूजी (Sambhaji Bhide of Shivpratishthan Sanghatana) येथे भेटीस आले आहेत. त्यामागे अन्य कोणताही हेतू नाही, अशी माहिती वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कऱ्हाडकर (Senior guide Bandatatya Karadkar) यांनी दिली. (Sambhaji Bhide Of Shivpratishthan Hindusthan Sanghatana Met Bandatatya Karadkar In Karad Satara Marathi News)

Summary

शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या संभाजी भिडे यांनी आज बंडातात्या कऱ्हाडकर यांची करवडी येथे जावून भेट घेतली.

शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या संभाजी भिडे यांनी आज बंडातात्या कऱ्हाडकर यांची करवडी येथे जावून भेट घेतली. यावेळी बंडातात्या व संभाजी भिडे यांची भेट झाली. त्यावेळी पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाच्या गजराने परिसर दणाणला. त्यानंतर दोघांनी बराच काळ गप्पा मारल्या. यावेळी झालेल्या स्थितीबाबत बंडातात्यांनी भिडे यांना माहिती दिली. त्यानंतर अल्पकाल दोघांनीही मनोगते व्यक्त केल्यानंतर श्री. बिडे व त्यांचे अनुयायी निघून गेले. त्यानंतर बंडातात्या कऱ्हाडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संभाजी भिडे व त्यांची भेट ही केवळ औपचारिकता होती, असे स्पष्ट केले.

Sambhaji Bhide
ज्या हातांना पकडलं, त्याच हातांनी पोलिसांना बंडातात्यांनी जेवू घातलं!
Bandatatya Karadkar
Bandatatya Karadkar

श्री. कऱ्हाडकर म्हणाले. पोलिसांनी वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढल्यानंतर त्याबद्दल सहानभूती वाटणारे अनेकजण येथे येवून भेटत आहेत. त्याच पद्धतीने हिंदूत्वावर काम करणारे आक्रमक असणारे भिडे गुरूजींनी आज येथे येवून भेटले. दरम्यान, त्यांनी अभिमान व स्वाभिमानही व्यक्त केला. श्री. भिडे व त्यांचे अनुयायीही येथे आले होते. श्रीकृष्ण गोपाल केंद्राकडे (Shrikrishna Gopalan Center) ते केवळ औपचारिक भेटीसाठी आले होते. काही लोकांच्या मनात शंका येण्याची शक्यता आहे, की यांची ही भेट ठरलेलीच होती. एकमेकांच्या विचारानेच आले आहेत. मात्र, असे काहीही नाही. केवळ ही भेट औपचारिक होती. पूर्वी ठरल्याप्रमाणेच असा कोणताही प्रकार झालेला नाही. भेटीप्रसंगी गुरूजी यांनी शिदोरी म्हणून संदेश दिला. त्यामुळे यापेक्षा वेगळं काहीच नाही. कारण, वारकरी सांप्रदायाचे मुळहिंदूच आहे. तो सर्वधर्मसमवाचाही आहे. त्यामुळे एका हिंदू संघटनेला वारकऱ्यांवर झालेला अन्याय सहन न झाल्यानेच शिवप्रतिष्ठानने त्यांची भावना सहानभूती व्यक्त केली, ती भावना आम्ही स्वीकारली आहे. यापेक्षा वेगळा काहीही रंग या भेटीला नाही.

Sambhaji Bhide Of Shivpratishthan Hindusthan Sanghatana Met Bandatatya Karadkar In Karad Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.