विषाणूच्या गुणसूत्रांतील बदलाचा शोध; साताऱ्यातील 131 जणांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला!

Corona Samples
Corona Samplesesakal
Updated on

सातारा : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे (Coronavirus) प्रमाण कमी येत नसल्यामुळे व्हायरसच्या गुणसूत्रामध्ये काही बदल झाले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील 131 जणांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्यात आले आहेत. तपासणीच्या अहवालानंतर उपचाराची व संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीची दिशा ठरविण्यात येणार आहे. (Samples Of 131 People From Satara District Sent To Delhi For Testing Satara News)

Summary

मार्च महिन्यापासून जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली. तेव्हापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली. तेव्हापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त जण कोरोनाबाधित होत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या (Corona Patient) मृत्यूंची संख्याही वाढली आहे. दररोज 30 ते 40 जणांना मृत्यूला कवटाळावे लागत आहे. कोरोना संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा झुंजत आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. एक जूनपर्यंत कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. तरीही कोरोनाबाधितांचा आकडा कमी येत नाही. रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामध्ये ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडची कमतरता भासत आहे. या एकंदर परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वेगळा स्टेन आहे काय, याची शंका वैद्यकीय अधिकाऱ्यांना येऊ लागली आहे.

कोरोना व्हायरस आपले रूप बदलत असल्याचे काही ठिकाणी समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कोरोना विषाणूच्या गुणसूत्रांचा ढाचा तपासण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या लाटेत जिल्ह्यामध्ये असलेल्या कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी चार जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले होते. त्यातून त्या व्हायरसच्या गुणसूत्रांच्या ढाच्याचा अभ्यास करण्यात आला होता. कोरोना विषाणूच्या गुणसूत्रांच्या ढाच्यात काही बदल झाल्यास व्हायरस आपले रूप व कार्यपद्धतीही बदलत असतो. त्यामुळे नवीन व्हायरस आहे का, याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयातून 131 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्यात आले आहेत. रविवारी (ता. 23) हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Subhash Chavan) यांनी दिली. या नमुन्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून दिल्लीच्या तज्ज्ञांकडून जिल्हा रुग्णालयाला मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा मुकाबला करणे सोपे होणार आहे. लाट आटोक्‍यात आणण्यास त्याची मदत होणार आहे.

Corona Samples
FACT CHECK : सातारकरांनो! तुमच्या मोबाईलवर आलेला बिबट्याचा VIDEO सोनगावचा नाही

जिल्हा रुग्णालयातून 131 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून दिल्लीच्या तज्ज्ञांकडून जिल्हा रुग्णालयाला मार्गदर्शन केले जाणार आहे.

-डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

Samples Of 131 People From Satara District Sent To Delhi For Testing Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.