फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा : पावसकर

फडणवीसांनी नुकसानीचे पंचनामे होण्याआधी पूरग्रस्तांना केली होती मदत
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

सातारा : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त (Satara Sangli Kolhapur Flood) आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती, तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Bharatiya Janata Party Leader Vikram Pawaskar) यांनी केली आहे. श्री. पावसकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजमधून संकटग्रस्तांच्या वाट्याला फार कमी मदत येणार आहे. आघाडी सरकारने जाहीर केलेल्या मदतीमधील सात हजार कोटी दीर्घकालीन उपाय योजनांसाठी तर तीन हजार कोटी पुनर्बांधणी, पुनर्वसनासाठी आहेत. सात हजार कोटींची उपाययोजनारूपी मदत मिळेल तेंव्हा मिळेल. पण, सध्या संकटग्रस्तांना तातडीने रोख मदतीची गरज आहे.

Summary

फडणवीस सरकारने नुकसानीचे पंचनामे होण्याआधी पूरग्रस्तांना घरोघरी जाऊन पाच हजार रुपयांची रोख मदत पोहचविली होती.

३१ ऑगस्ट २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी मदतीचा जो शासन आदेश काढला होता, त्याप्रमाणे मदत देणार असे आघाडी सरकारने जाहीर केले होते. मात्र, या मदतीमध्येही आघाडी सरकारने कपात केल्याचे दिसते. फडणवीस सरकारने नुकसानीचे पंचनामे होण्याआधी पूरग्रस्तांना घरोघरी जाऊन पाच हजार रुपयांची रोख मदत पोहचविली होती.

Devendra Fadnavis
सनसनीखेज आरोप करण्यापलिकडं चित्रा वाघांना काही येतं?

तसेच संकटग्रस्तांच्या बँक खात्यात १० हजार रूपये जमा केले होते. अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्यांची घरे राहण्यायोग्य राहिली नव्हती, अशा लोकांना शहरी भागात ३६ हजार तर ग्रामीण भागात २४ हजार रूपये . एकरकमी घरभाडे म्हणून दिले होते. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती अशांना ९५ हजार १०० रूपये धनादेशाद्वारे देण्यात आले होते, अशी भरघोस मदत आघाडी सरकारने द्यावी असेही विक्रम पावसकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()