दहिवडी : मायणी मेडीकल काॅलेज प्रकरणात तत्परता दाखविणारे जिल्हा पोलिस अधीक्षक माणमधील चारा छावणी प्रकरणी गप्प का असा प्रश्न शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. संजय भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, मायणी मेडीकल काॅलेज जमीन प्रकरणात मयत व्यक्तीचे नावे खोटे दस्तावेज बनविणे व अॅट्रॉसिटी अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावूनही अजूनही जामिन मिळू न शकलेल्या गुन्ह्याचा तपास गतीने सुरु आहे. मात्र सरकार बदलताच काही तासातच उपविभागीय पोलिस अधिकारी वडूज यांच्याकडील काढून घेत तो कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकार्यांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलिस अधिक्षक सातारा यांनी घेतलेला हा निर्णय राजकीय दबावाने तरी घेतला नाही ना? यामागील हेतू काय? अशा दबक्या आवाजातील जनतेमधील चर्चांना उत आला आहे. मात्र माणमधील चारा छावणी भ्रष्टाचार प्रकरणाला दीड वर्षे झाले असताना गुन्ह्याचा तपास अधिकारी मागणी करुन देखील बदलला गेला नाही हा दुजाभाव का? संजय भोसले पुढे म्हणाले, या प्रकरणाच्या तपासातील दिरंगाई संभाव्य आरोपींच्या बचावास कारणीभूत ठरु शकते. अवधी मिळून कागदपत्रांमधील बदल आरोपींच्या पत्यावर पडू शकतो. अशा शंका उपस्थित करुन देखील जिल्हा पोलिस अधिक्षक छावणी प्रकरणात आजपर्यंत मूग गिळून गप्प राहिले आहेत. गुन्हा कोणताही असो तो गुन्हा असतो. मायणी प्रकरणात जशी तत्परता दाखविली तशी छावणी प्रकरणात दाखवावी अशी मागणी संजय भोसले यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.