Karad : उदयनराजे-शिवेंद्रराजे वादावर राऊतांचा थेट प्रहार; म्हणाले, 'हा तर छत्रपतींच्या गादीचा अपमान..'

साताऱ्याच्या दोन्ही राजांनी रस्त्यावर वाद घालणं चुकीचं आहे.
Sanjay Raut criticism Udayanraje Shivendraraje Bhosale
Sanjay Raut criticism Udayanraje Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

तुम्ही दोन्ही राजे रस्त्यावर उतरून वाद घालणार किंवा भांडणं करणार असाल तर तो गादीचाच अपमान आहे.

कराड : साताऱ्याच्या दोन्ही राजांनी रस्त्यावर वाद घालणं चुकीचं आहे. हा तर छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे, असं स्पष्ट मत शिवसेना नेते (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं.

संजय राऊत सातारा आणि पाटण दौऱ्यावर आहेत. कराड इथं राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, कोणीही राजेंवर टीका केली तर तो छत्रपती शिवरायांचा, गादीचा अपमान ठरतो.

Sanjay Raut criticism Udayanraje Shivendraraje Bhosale
Solapur : महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? दहा पदाधिकाऱ्यांच्या निवडी, जातीय समिकरणाची जुळवाजुळव

मात्र, तुम्ही दोन्ही राजे रस्त्यावर उतरून वाद घालणार किंवा भांडणं करणार असाल तर तो गादीचाच अपमान आहे, अशी टीकाही खासदार राऊत यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत केली.

Sanjay Raut criticism Udayanraje Shivendraraje Bhosale
Karnataka : दारुण पराभव होताच भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून गोंधळ; मोदींना पत्र लिहित सोमण्णांचा पदावर दावा

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) या दोघांसह त्यांचे समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनावरून आमने-सामने आले होते. त्यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात वाद झाला होता. यावर राऊतांनी भाष्य केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()