'अजित पवार चिडून बोलले अन् त्या वाक्याचा उपयोग माझ्याविरोधात केला'

Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on
Summary

'खासदार उदयनराजे भोसलेंचा अर्ज मागे घेते वेळी कॉन्फरन्स कॉलवर कोण बोललं, याचा शोध घेतला तर..'

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील (Satara District Bank Election) पराभवात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव घेणे योग्य नाही. मी शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार आणि सुप्रिया सुळे या (Supriya Sule) तिघांचाही लाडका आहे. तिघांनीही मला प्रेम दिले आहे. अजित पवारांनी उपहासातून बोललेल्या वक्तव्याचा आधार काही मंडळी घेत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना केला.

जिल्हा बॅंक निवडणूक, २०१९ ची विधानसभा निवडणूक, शरद पवारांची गाजलेला पावसातील सभा यावर शिंदे यांनी मनमोकळी उत्तर दिली. बॅंकेच्या निकालावर बोलताना त्यांनी गर्भित इशारेही दिले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील नेत्यांनी एकमेकांना गरम, गार करण्याचे इशारे दिले होते. या सर्व परिस्थितीत तुम्ही आता शांत झाला आहात का, या प्रश्नावर आमदार शिंदे म्हणाले, ‘‘१९९९ पूर्वी मी आक्रमक होतो; पण आता शांत झालो आहे.’’ तुमचा जिल्हा बँकेतील निकाल महाराष्ट्रात गाजला. या पराभवाला अनेक नेते कारणीभूत ठरले. त्यामुळे या सर्वांना तुम्ही बघून घेऊ, असा इशारा दिला होता. तो नेमका कोणासाठी होता, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘मी सरळ राजकारणी आहे. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पवार साहेबांनी राजकीय व्यासपीठ दिले. पक्षाने संधी दिली; पण २०१९ ची विधानसभा निवडणूक ते आताची जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत राजकारण बघितले. त्यावर बोलणे गरजेचे होते. म्हणून मी व्यक्त झालो.’’

Shashikant Shinde
माजगाव : निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा धुव्वा

पाचगणीच्या बैठकीवेळी माझ्याकडे ३२ मतदार होते. त्यानंतर एक तारखेच्या बैठकीवेळी २७ जण होते; पण माझ्या विरोधात दुसरा कोणी अर्ज भरणार नव्हते. या आशेवर मी लोकांना जायला सांगितले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. मला गाफिल ठेवले गेले. त्याचा परिणाम झाला. गाफिल ठेवणाऱ्यांनीच माझा विश्वासघात केला, असे त्यांनी सांगितले. माझ्या विरोधातील जिल्हा बॅंकेचे उमेदवार रांजणे हे आपल्या शब्दाबाहेर नसल्याचे शिवेंद्रसिंहराजे सांगत होते. मात्र, त्यांनी भूमिका बदलली. आम्ही समजून सांगतो; पण रांजणे ऐकत नाहीत, असे त्यांनी म्हणण्यास सुरुवात केली; पण शिवेंद्रसिंहराजे (Shivendrasinharaje Bhosle) यांनी यापूर्वीचे सांगितले असते तर हे सर्व संपले असे समजून मी वाटचाल केली असती, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत रांजणेंना अजितदादा उपाहासातून बोलले होते. तुझ्याकडे ३५ मतदार आहेत, तर जा लढव तू, असे चिडून बोलले होते. मात्र, त्या वाक्याचा उपयोग माझ्याविरोधात केला गेला. खरे तर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा अर्ज मागे घेता वेळी कॉन्फरन्स कॉलवर कोण बोलले, याचा शोध घेतला तर माझ्या विरोधातील नेता कोण याचे उत्तर मिळेल, असे त्यांनी सांगितले.

Shashikant Shinde
जेव्हा भारतातील मुसलमान एकत्र येतील, त्या दिवशी सर्व घाबरतील : ओवैसी

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्या बंगल्यावर आमच्या पाच आमदारांची बैठक झाली होती. जिल्हा बॅंकेवर जावळीतून मी दोनदा निवडून आलो आहे. त्यामुळे या तालुक्यातील सहकार क्षेत्र मी बघायचे, असे ठरले होते, तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी सहकार्याचा शब्द दिला होता.

- शशिकांत शिंदे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.