सातारा : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (balasaheb patil) सूचनेनुसार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दहा मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले हाेते. आज (रविवार) पुन्हा त्याची मर्यादा वाढविण्यात आली. नव्या नियमनूसार मेडिकलची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद राहतील. या कालावधीत सकाळी सात ते 11 या वेळेत घरपोच सुविधा देता येणार आहेत. कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी सात ते 11 या वेळेतच सुरू राहतील. या दुकानांची घरपोच सुविधा सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहे. satara breaking news lockdown extended 15 may balasaheb-patil
आज (रविवार) प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी नवे निर्बंध लागू केले. शिंदे यांनी त्याबाबतचा आदेश काढला आहे. यामध्ये 15 मे पर्यंत सर्व किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई आदी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी विक्रीची दुकाने, पाळीव प्राण्याच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. या कालावधीत या दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी असेल, तसेच कृषी अवजारे व शेतीतील उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरू राहतील. या दुकानांची घरपोच सुविधा सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू ठेवता येणार आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12 ते रात्री आठ यावेळेत सुरू राहतील. मद्य विक्रीबाबत दुपारी 12 ते सायंकाळी पाच यावेळेतच घरपोच सुविधा सुरू राहील. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहिता, साथरोग अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असेही प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
अशी आहे घरपोच सुविधा....
हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री : दुपारी 12 ते रात्री आठ
कृषी, शेतीशी निगडित दुकाने : सकाळी सात ते सायंकाळी पाच
मद्यविक्री : दुपारी 12 ते सायंकाळी पाच
मटण, चिकन, अंडी, मासे : सकाळी सात ते अकरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.