आर्थिक विवंचनेतून धरली मुंबईची वाट अन्‌ पडली मृत्यूशी गाठ

कोरोना
कोरोना
Updated on

कास (जि. सातारा) : डोंगर माथ्यावरील कुसुंबीमुरा गावातील आखाडे वस्तीतील एक मुंबईकर रविवारी रात्री नऊच्या सुमारास गावात आला. त्याच रात्री बारानंतर त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्याला त्याच रात्री जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने जावळी तालुक्‍यात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबातील कर्त्या युवकाच्या मृत्यूने त्याच्या पश्‍चात तीन लहान मुले, आई, भाऊ असा परिवार उघड्यावर येणार आहे. 

जावळी तालुका दुर्गम व डोंगराळ. डोंगरदऱ्यात त्याची तुटपुंजी शेती आहे. ती सुद्धा निसर्गावर अवलंबून. त्यामुळे रोजगारासाठी मुंबईशिवाय पर्याय नाही. अशातच मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यावर अनेक कुटुंबे गावाकडे आली आहेत. गावाला येऊन तीन- तीन महिने झाल्याने होता नव्हता तेवढा पैसा संपला आहे. पावसा-पाण्याचे दिवस आल्याने घरात खायचे काय हा प्रश्न सर्वांसमोरच पडला आहे. याच आर्थिक विवंचनेमुळे अनेक जण जिवावर उदार होऊन कुटुंबाला गावी ठेऊन मुंबईची वाट धरत आहेत; पण मुंबईत असलेल्या कोरोनाच्या हाहाकारात असे कुटुंब प्रमुख सापडू लागल्याने अनेक कुटुंबे निराधार होत आहेत. 

कोरोना किती काळ असेल हे कोणी सांगू शकत नाही; पण बिन कामधंद्याचे गावाला किती दिवस राहायचे? बरे राहिले तर आर्थिक प्रश्न सोडवायचा कसा? याच विवंचनेत जावळीतील अनेक कुटुंबे अडकली असून, त्यांच्यासाठी इकडे आड अन्‌ तिकडे विहीर अशी स्थिती मुंबईकर चाकरमान्यांची झाली आहे. तीच या तरुणाच्या मृत्यूच्या निमित्ताने पुढे आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.