काशीळ (जि. सातारा) : कोरोनामुळे अनेक साखर कारखान्यांच्या मजुरांनी दांडी मारल्याने ऊस तोडणी यंत्रणा विस्कळित होऊन ऊस तोडणीस विलंब होत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पन्नावर होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी रामकृष्णनगर (ता. सातारा) येथील अभियंता सनी दिलीप काळभोर या शेतकरीपुत्राने ऊस भरणीसाठी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे दिवसभरात 70 ते 75 टन ऊस भरला जात आहे.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत ऊस पीक घेतले जाते. ऊस गाळपाचे 16 कारखाने आहेत. सध्या ऊस हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी ऊसतोडणी मजुरांची टंचाई भासत असल्यामुळे अनेक कारखान्यांत अपेक्षित गाळप होताना दिसत नाही. मागील हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये कोरोनाची साथ आल्याने ऊसतोडणीस परमुलकातून आलेल्या मजुरांना त्यांच्या मुलकात पाठवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागलेले होते. त्यामुळे या हंगामात मजूर टंचाई जाणवत आहे. परिणामी, ऊस तोडणीत विलंब होत आहे. दरम्यान, कोरोनामुळे रामकृष्णनगर (ता. सातारा) येथील सनी दिलीप काळभोर या अभियंत्याला शिक्षण पूर्ण केल्यावर घरी थांबावे लागले. या काळात ऊस तोडणी मजुरांच्या समस्येची जाणीव त्यांना झाली. या समस्येवर आपण काहीतरी उपाय केला पाहिजे, असा विचार मनात आला.
त्यावर सनी यांना ट्रेलरमध्ये भरणीसाठी यंत्र तयार करण्याची कल्पना सुचली. त्यावर मे 2020 मध्ये काम सुरू केले. यंत्र तयार करताना ते यंत्र कमी जागेत बसणारे, सहज वाहतूक करता येईल, शेताच्या आकारमानानुसार कमी-जास्त करता येईल, याचा विचार करत निर्मिती सुरू ठेवली. या यंत्राचे डिझाइन व निर्मितीसाठी चार महिन्यांचा कालवधी गेला. लोखंड, नटबोल्ट, चेन, टायर, बेरिंग, दातीचक्र, टर्निग टेबल तसेच इंजिनचा वापर करून हे यंत्र बनवले आहे. या यंत्रासाठी सनीला दोन लाख रुपये खर्च आला आहे. 75 फूट लांबीचे हे यंत्र असून, ते फोल्डिंग करून 25 फुटांचेही होत आहे. हे यंत्र ट्रॅक्टर ट्रेलरला जोडले जाते व पट्ट्यावर उसाच्या मोळ्या टाकल्या जातात. इंजिनद्वारे पट्टे फिरले जात असल्याने उसाच्या मोळ्या थेट ट्रेलरमध्ये पडतात. सनीने या यंत्राचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला असून, अजिंक्यतारा, सह्याद्री साखर कारखान्यांचे संचालक, अधिकारी तसेच परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांनी पाहणी केली आहे.
ऊस भरणी यंत्राची वैशिष्ट्ये...
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.