सातारा : साखर गळिताचा हंगाम धिम्या गतीने सुरू असल्याने आणि अजून दोन महिने म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गळीत चालणार आहे. अद्याप मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाविना उभा आहे. तोडणी वाहतूक यंत्रणा विस्कळित असल्याने कारखान्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच साखरेची किमान आधारभूत किंमत 3100 रुपयांपर्यंत असून, कारखान्यांची एफआरपी त्यापेक्षा जास्त जात असल्याने ऊस दरावरून कारखाने अडचणीत आल्याचे चित्र आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यांत जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 82 लाख 35 हजार 218 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 91 लाख 13 हजार 795 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील 15 साखर कारखाने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून उसाचे गाळप करत आहेत. आतापर्यंत सर्व कारखान्यांनी मिळून 82 लाख 35 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे. अद्याप मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असून, तोडणी व वाहतूक यंत्रणा यावेळेस कोरोनामुळे विस्कळित असल्याने आता कारखान्यांनी हार्वेस्टरच्या वापरावर भर दिलेला आहे. यावर्षी साखरेचे सुरवातीचे दर 3400 रुपयांपर्यंत होते. त्यामुळे कारखान्यांना उसाचा दर देण्यात कोणतीही अडचण वाटत नव्हती. पण, आता साखरेचे दर 3100 रुपयांवर असून, कारखान्यांची एफआरपी 3150 ते 3200 पर्यंत जात आहे. त्यामुळे कारखान्यांना तोट्यात राहूनच ऊस दर द्यावा लागणार आहे. त्यामुळे कारखान्यांनी केंद्र सरकारकडे साखरेची एमएसपी वाढविण्याची मागणी केलेली आहे.
जिल्ह्यात यावर्षी ऊस तोडणी धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही ऊस कधी जातोय, याची चिंता लागली होती. त्यातच तोडणी वाहतूक यंत्रणेकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्याकडे कारखान्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. हा संपूर्ण ऊस गाळप होण्यासाठी कारखान्यांचा हंगाम आणखी दोन महिने चालणार आहे. साधारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप चालणार आहे. तर काही लहान कारखान्यांचे गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षी उसाची पळवापळवी झालेली नाही. प्रत्येक कारखान्याला त्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करताना नाकीनऊ आले आहे.
यावेळेस सह्याद्री, कृष्णा व रयत कारखान्यांना चांगला उतारा मिळाला आहे. सहकारी साखर कारखान्यांत "सह्याद्री'ची आघाडी असून, त्यांना 12.46 टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर खासगीमध्ये न्यू फलटण शुगरला 11.92 टक्के साखर उतारा मिळाला आहे. खासगी कारखान्यांनी आतापर्यंत 44 लाख 42 हजार 971 मेट्रिक टन उसाचे गाळप करत 46 लाख 68 हजार 830 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी 10.51 टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर सहकारी साखर कारखान्यांनी 37 लाख 92 हजार 247 मेट्रिक टन उसाचे गाळप करत 44 लाख 44 हजार 965 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.
कारखानानिहाय साखर उतारा
श्रीराम-जवाहर फलटण 11.65, कृष्णा 12.10, किसन वीर भुईंज 8.89, लोकनेते देसाई कारखाना 11.99, सह्याद्री 12.46, अजिंक्यतारा 11.63, रयत अथणी शुगर 12.09, खंडाळा कारखाना 6.29, न्यू फलटण शुगर 11.92, जरंडेश्वर शुगर 11.14, जयवंत शुगर 10.85, ग्रीन पॉवर शुगर 11.15, स्वराज इंडिया ऍग्रो 8.49, शरयू शुगर 9.44, खटाव-माण शुगर 10.85.
पृथ्वीराज चव्हाणांचा घात करणारे काय विकास साधणार?; भाजपचे यादवांना चोख प्रत्युत्तर
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.