Satara: देशमुखांना मोहरा करून माझ्यावर आरोप, आमदार जयकुमार गोरे यांचे स्पष्टीकरण

Jaykumar Gore: विमा कंपनीकडून एक कोटी ४६ लाख ४०० रुपयांचा क्लेम मिळाला होता
Satara: देशमुखांना मोहरा करून माझ्यावर आरोप, आमदार जयकुमार गोरे यांचे स्पष्टीकरण
Updated on

latest Marathi News: मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात आजही संदीप देशमुख हेच लॉगिन आयडी वापरत असून, त्यांनीच फेरफार केलेला आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशमुखांना मोहरा करून माझ्यावर आरोप केले आहेत.

हा सर्व राजकीय स्टंट असून, येणाऱ्या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. पोलिस चौकशीत माझे कुठेही कनेक्शन मिळणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार जयकुमार गोरे यांनी आज येथील पत्रकार परिषदेत दिले.

दरम्यान, रामराजेंनी लुटुपुटूची लढाई करण्यापेक्षा समोरासमोर येऊन लढावे. मी हा अन्याय सहन करणार नाही आणि शरद पवार यांच्यापुढेही झुकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मायणी मेडिकल कॉलेजप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांबाबत आज आमदार जयकुमार गोरे यांनी लाल पोतडी भरून पुरावे आणून पत्रकारांना सादर केले.

Satara: देशमुखांना मोहरा करून माझ्यावर आरोप, आमदार जयकुमार गोरे यांचे स्पष्टीकरण
Satara Rain : वाईत महागणपती मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी; धोम धरणातून विसर्ग वाढविल्याने कृष्णा नदीला पूर

जिवंत व्यक्ती मृत दाखवून २०० कोटी हडपल्‍याच्‍या आरोपाला उत्तर देताना आमदार गोरे म्हणाले, ‘‘कोरोना काळात महात्मा फुले योजनेत मायणी हॉस्पिटल बसविण्यासाठी तात्पुरता लॉगिन आयडी संदीप देशमुख यांच्या नावावर होता. माझ्या सहीने केवळ विमा कंपनीशी करार केला होता. या योजनेतून विमा कंपनीकडून एक कोटी ४६ लाख ४०० रुपयांचा क्लेम मिळाला होता. प्रत्यक्षात २७ रुग्ण मायणी हॉस्पिटलमध्ये होते.

त्यावेळी ऑक्सिजनसह इतर विविध सोयी मिळण्यासाठी मी स्वत: मित्रांकडून तीन कोटी ६० लाख रुपये जमा केले होते. त्यावर रुग्णांवर उपचार केले. त्यानंतर हे हॉस्पिटल बंद पाडण्याचा घाट घातला गेला. त्यासाठी संदीप देशमुखांना मोहरा करून माझ्यावर आरोप केले गेले. दोनशे रुग्णांचा आरोप केलेला असताना प्रत्यक्षात ३५ रुग्णांची यादी याचिकेत आहे; पण प्रत्यक्षात दोनच रुग्णांचे पैसे त्यावेळी ७२ हजार रुपये मिळाले होते. त्यावेळी सव्वा कोटी रुपये हॉस्पिटललाच इतरांचे देणे होते. आम्ही उपचार केलेल्या रुग्णांचा क्लेम विमा कंपनीकडे मागीतला होता. त्यावरील रिपोर्टच्‍या तारखेत त्यांनी फेरफार केला. एकूणच या प्रकरणातून माझ्याविरोधात वातावरण तयार केले आहे.’

Satara: देशमुखांना मोहरा करून माझ्यावर आरोप, आमदार जयकुमार गोरे यांचे स्पष्टीकरण
Satara: गमेवाडीत पर्यटन स्थळास राज्य शासनाची मंजुरी, पर्यटनाला मिळणार चालना

आमच्‍या माणच्‍या नेत्‍यांना विधानसभा लढायची असून, त्यांना जयकुमार गोरेंचा पराभव करायचा आहे. त्यासाठी हे ठरवून चालले आहे. वेळ आली की सर्व काही बोलणार आहे. रामराजेंचा नातेवाईक न्यायाधीश म्हणून बसलेला असल्याची चर्चा ते करत आहेत. म्हणून ही याचिका निवडणुकीपूर्वी दाखल केली आहे; पण जयकुमार गोरे यांनी एकही पैसे घेतला असेल, तर मी स्वत: पोलिसांपुढे हजर होईन, असेही ते म्हणाले. शरद पवार यांना माझे आव्हान आहे, त्यांनी गोरेंविरोधात निवडणूक लढावी. यावेळी गोरे यांनी जयंत पाटील हा घोटाळेबाज माणूस आहे, अशी टीकाही केली.

देशमुख कुटुंबाला दोन वेळा ईडी नोटीस

माझे ईडीने ऐकावे इतका मी मोठा नाही. उलट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन देण्यासाठी ६८० विद्यार्थ्यांचे १२२ कोटी रुपये परवानगी नसताना घेतले होते. त्याची चौकशी सुरू असल्याने देशमुख कुटुंबाला दोन वेळा ईडी नोटीस आली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तीन वेळा सुनावणी झाली. शेवटी न्‍यायालयाने जामीन फेटाळला. त्‍याच्‍या तपासासाठी ईडी त्यांच्या घरी आली आहे, असेही श्री. गोरे यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

Satara: देशमुखांना मोहरा करून माझ्यावर आरोप, आमदार जयकुमार गोरे यांचे स्पष्टीकरण
Satara Accident: बापरे किती भयंकर! साताऱ्यात सेल्फी काढताना मुलगी 250 फूट दरीत कोसळली अन्... अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा VIDEO

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()