सातारा : कोरोना संसर्गाचा वेग(corona) जिल्ह्यात वाढू लागला असून सर्वाधिक रुग्णसंख्या ही सातारा व कऱ्हाड (coronan satara and karad)तालुक्यांत आहे. गेल्या दोन लाटांमध्ये कऱ्हाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. सध्याच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत(third wave of corona) सातारा व कऱ्हाड तालुक्यांची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पण, सध्या बाधितांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणातच उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या व ऑक्सिजन मागणी कमी असल्याने सध्या तरी आरोग्य यंत्रणेवर ताण जाणवत नाही. (Satara Corona News Update)
जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोना लाटांच्या (coorna wave)तुलनेत या लाटेत रुग्णांमध्ये सौम्य लक्षणेच सापडत आहेत. पण, संसर्गाचा वेग २९.३२ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे धोका कायम असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. संसर्गाचा वेग वाढत गेल्यास जिल्हा प्रशासनाकडून आणखी कडक निर्बंध(corona restrictions) लावले जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे आणखी रुग्णसंख्या वाढल्यास त्यांना उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व तयारी केलेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे कऱ्हाड व सातारा तालुक्यांत सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. साताऱ्यात आज २७५, तर कऱ्हाडात १५१ रुग्ण बाधित आढळले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या ही ग्रामीण भागात आहे. पण, या सर्व रुग्णांवर लक्षणेनिहाय गृहविलगीकरणात(home quarantine) डॉक्टर उपचार करत आहेत. अशा रुग्णांची माहितीही आरोग्य विभाग घेत आहे.
जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती
कऱ्हाड- सात लाख ६७ हजार ७०,
सातारा- सात लाख ५० हजार,
पाटण- तीन लाख ३८ हजार ४१७,
वाई- दोन लाख ४७ हजार ५४५,
जावळी- एक लाख ३४ हजार ७४५,
कोरेगाव- तीन लाख ३० हजार,
माण- दोन लाख ६३ हजार २९०,
खटाव- तीन लाख ५५ हजार ७६६,
फलटण- चार लाख ३२ हजार ८००,
महाबळेश्वर- एक लाख ४ हजार ७०१,
खंडाळा- दोन लाख ३४ हजार ९१८.
एकूण लसीकरण- ३९ लाख ५० हजार २२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.