दहिवडी : बहुचर्चित व लक्षवेधक माण- खटाव विधानसभा मतदारसंघात सलग तीनदा आमदार असलेल्या जयकुमार गोरे यांना यंदा पराभूत करायचेच असा चंग बांधलेल्या महाविकास आघाडीचे घोडे उमेदवार निवडीतच अडले आहे. आमदार जयकुमार गोरे यांची उमेदवारी जाहीर करून भाजपने एक पाऊल पुढे ठाकले आहे. दुसरीकडे गोरेंच्या विरोधात कोणाचे नाव निश्चित होणार याची उत्सुकता आहे.