Satara Assembly Election :अनेक मतदारसंघांत काट्याची टक्कर

Satara Assembly Election : जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या बाजूने चुरशीने प्रचार झाला. माजी मुख्यमंत्र्यांसह आजी, माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; लढतींकडे राज्याचे लक्ष
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024sakal
Updated on

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची आज सांगता झाली. जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या बाजूने चुरशीने प्रचार झाला. अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी सभा घेतल्या. यातील अनेक मतदारसंघांत अटीतटीच्या लढती होत असल्याचे चित्र आहे.

माण-खटाव, कोरेगाव, पाटण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, फलटण या मतदारसंघांत उमेदवारांसोबतच महायुती व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

माण-खटावमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांच्यात लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला. येथील जनता कोणाच्या पारड्यात कौल देणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

कोरेगावात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यात काट्याची टक्कर आहे. महेश शिंदेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. त्यामुळे येथे कोणत्या शिंदेंना मतदार विधानसभेत पाठविणार? याची उत्सुकता आहे.

पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हर्षद कदम रिंगणात आहेत, तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आहे. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या सभा यामतदारसंघात झाल्या आहेत.

कऱ्हाड उत्तरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार असून, त्यांच्या विरोधात भाजपचे मनोज घोरपडे यांच्यात पारंपरिक लढत आहे. महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार, तर महायुतीकडून भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ यांच्या सभा या मतदारसंघात झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सहाव्यांदा बाळासाहेब पाटील बाजी मारणार, की परिवर्तन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यात चुरशीची लढत आहे. भाजपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दिग्गज नेत्यांच्या सभा या मतदारसंघात झाल्या आहेत. चव्हाण यांच्यासाठी सतेज पाटील, सचिन पायलट यांनी सभा घेतल्या. मतदार पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा संधी देणार, की परिवर्तन घडवत अतुल भोसलेंना विधानसभेत पाठविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा-जावळीत महायुतीकडून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अमित कदम यांच्यात लढत आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Satara Crime : घरात जेवण बनविण्याच्या वादातून पतीने केला पत्नीचा खून; लाथाबुक्क्या, लाकडी काठीने बेदम मारहाण

शिवेंद्रसिंहराजेंसाठी खासदार उदयनराजे भोसले प्रचारात सक्रिय होते. त्यामुळे सातारा- जावळीचा मतदार कोणाला विधानसभेत पाठविणार? याची उत्सुकता आहे.

वाई मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ आणि अपक्ष पुरुषोत्तम जाधव हे रिंगणात आहेत. येथे तिरंगी लढत असून, येथे राष्ट्रवादीकडून खासदार शरद पवार यांची सभा झाली. त्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे मतदार कोणाला विधानसभेत पाठविणार? याबाबत उत्सुकता आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Satara Assembly Election 2024 : होमगार्डस्‌चा आर्थिक भार पोलिसांवरच

फलटण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार दीपक चव्हाण विरुद्ध महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांच्यात लढत आहे. येथे दीपक चव्हाणांसाठी शरद पवारांच्या दोन, तर सचिन पाटील यांच्यासाठी अजित पवार यांच्या दोन सभा झाल्या आहेत. त्यामुळे येथील मतदार परिवर्तन घडविणार की दीपक चव्हाण यांनाच पुन्हा संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.