Satara Assembly Election 2024 : तुमच्यामुळेच संस्था अडचणीत; पसरणीत अरुणादेवी पिसाळ यांची टीका

Wai-Khandal Vidhan Sabha Election 2024 : तुम्ही अडचणीतील संस्था वाचविल्याचा आव आणत असलात, तरी त्या अडचणीत येण्यासाठीही तुम्हीच कारणीभूत आहात, अशी टीका महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांनी केली.
Arunadevi Pisa
Arunadevi PisalSakal
Updated on

वाई : लक्ष्मणतात्या आणि मदनआप्पांनी एकमेकांना निष्ठा आणि विचार ठेवून साथ दिली. संस्थांना उभारी देण्यात योगदान दिले.

तुम्ही अडचणीतील संस्था वाचविल्याचा आव आणत असलात, तरी त्या अडचणीत येण्यासाठीही तुम्हीच कारणीभूत आहात, अशी टीका महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांनी केली.

पसरणी (ता. वाई) येथे अरुणादेवी पिसाळ यांनी मतदारांशी संवाद साधला. या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी बापूसाहेब शिंदे, किरण खामकर, उपसरपंच बद्रीनाथ महांगडे, ॲड. नाजुका जाधव, नयन महांगडे, संतोष महांगडे, राजेंद्र येवले, चंद्रकांत महांगडे, आनंदराव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Arunadevi Pisa
Satara Assembly Election 2024 : जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करेल : आमदार शशिकांत शिंदे

अरुणादेवी पिसाळ म्हणाल्या, ‘‘१५ वर्षे आमदार असूनही कोणताही भरीव प्रकल्प त्यांना उभारता आला नाही. एका बाजूला मतदारसंघातील जनता मूलभूत सोयी सुविधांसाठी झगडत आहे अन् दुसरीकडे आपले आमदार स्वतःच्या कुटुंबाची पदे वाढविण्यात मश्गूल आहेत.

तिन्ही तालुक्यांत त्यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीशिवाय कुणीच क्षमतेचा माणूस भेटत नाही का? ही एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी मला एकदा संधी द्या. एक महिला म्हणून विकासकामे मार्गी लावण्यात कुठेही कमी पडणार नाही.’’

बापूसाहेब शिंदे म्हणाले, ‘‘यावेळी मतदारसंघात आमदारविरोधी सुप्त लाट आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असून, त्यांचा विकासाचा बुडबुडा फोडल्याशिवाय जनता शांत बसणार नाही.’’

Arunadevi Pisa
Satara Assembly Election : विकासकामांसाठी सदैव कटिबद्ध : डॉ. अतुलबाबा भोसले; महायुतीची काल्यात प्रचारसभा

दरम्यान, अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ वाई तालुक्याच्या पश्चिम भागात उत्स्फूर्त रॅली काढण्यात आली. या वेळी ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.