Satara Assembly Election : ग्रामीण भागात शिवशाही, निमआराम बस

Satara Assembly Election : मार्गावर शिवशाही, निम आराम व इलेक्ट्रिक गाड्या सोडणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटी प्रशासनाचा निर्णय; निवडणुकीसाठी ४४९ लालपरी आरक्षित
ST
STsakal
Updated on

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठीचे साहित्य घेऊन जिल्ह्यातील विविध केंद्रांवर जाण्यासाठी ४४९ लालपरी दोन दिवस आरक्षित करण्यात आल्या आहेत.

ज्या ठिकाणी फेऱ्या कमी होणार आहेत त्या मार्गावर शिवशाही, निम आराम व इलेक्ट्रिक गाड्या सोडणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता. १९) व बुधवारी (ता. २०) राज्य परिवहन महामंडळाकडून सातारा विभागातील तब्बल ४४९ बस जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

ST
Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी, अधिकारी, तसेच मतदानासाठी आवश्‍यक असलेले साहित्य पोच करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस दिमतीला घेतल्या आहेत.

यंदा सातारा जिल्ह्यातील विविध आगारांतून मतदान प्रक्रियेसाठी ४४९ बस पाठविल्या जाणार आहेत. त्यामुळे मात्र एसटी प्रवाशांना फटका बसणार आहे.

ST
Satara Assembly Election :अनेक मतदारसंघांत काट्याची टक्कर

खासगी वाहनांवर नजर ठेवावी

गणपती, दिवाळी या सणात खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू होती. आता निवडणुकीच्या मतदानाप्रसंगी एसटी बस आरक्षित असल्याने खासगी वाहनचालक प्रवाशांचा गैरफायदा घेऊन जादा दराने तिकीट आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन, आरटीओ विभागाने खासगी वाहनांवर नजर ठेवून जादा आकारणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.