Satara Assembly Election : पैशांचे वाटप होणाऱ्या ४८ गावांवर विशेष लक्ष : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara Assembly Election : आचारसंहितेचा भंग होईल, असे कृत्य कोणी केल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
निवडणुकीवर आयोगाचे विशेष लक्ष
Election Commission of Indiasakal
Updated on

सातारा : विधानसभेच्या निवडणुकीसाठीचा प्रचार साेमवारी पाच वाजता संपलेला असून, त्यानंतर मतदानापर्यंतचे ४८ तास महत्त्वाचे आहेत. या कालावधीत मतदारांना पैशाचे आमिष दाखवण्याचा प्रकार वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अशी ४८ गावे आम्ही शोधून काढली असून, त्याठिकाणी पैशांचे वाटप होण्याची शक्यता आहे.

कोरेगाव, माण, फलटण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, पाटण या मतदारसंघांतील ही गावे आहेत. या गावांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. आचारसंहितेचा भंग होईल, असे कृत्य कोणी केल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

धानसभेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराची सांगता आज झाली. या पार्श्वभूमीवर मतदानाची तयारी आणि आचारसंहिता भंगाचे प्रकार होऊ नयेत, म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत येत्या २० नोव्हेंबरला सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. आज पाच वाजता प्रचार संपल्यामुळे आता पैसे, दारूचा वापर व आचारसंहिता भंग होईल, अशा प्रकारची कृत्ये घडण्याची शक्यता आहे. त्यावर निवडणूक प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ४८ गावांत विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

आतापर्यंत सी व्हिजिल ॲपवर एकूण १०७ तक्रारी आल्या असून, सर्व १०७ तक्रारी निकाली काढल्या आहेत. १९५० या नंबरवर एकूण ११ तक्रारी दाखल असून, त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. अकरा गुन्हे दाखल केले आहेत.

दारू, पैशाचा गैरवापर व मतदारांवर दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या उमेदवार, व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. तेथे नियुक्त केलेले कर्मचारी व्यवस्थित काम करतात की नाही, याचीही तपासणी होत आहे.’’

१३ कोटींची रोकड जप्त

निवडणूक प्रचार काळात जिल्ह्यात १३ कोटी ११ लाख ८४ हजार रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे. यामध्ये फलटण मतदारसंघात १८ लाख ९९ हजार ४६३, वाई : एक कोटी ५४ लाख १६ हजार ७८५, कोरेगाव : ३२ लाख २७ हजार ९०८, माण ः १५ लाख, चार हजार ४५५, कऱ्हाड दक्षिण : सात कोटी ९९ लाख पाच हजार २०६, कऱ्हाड उत्तर : ६१ लाख ७९ हजार ९९९, पाटण : एक कोटी सहा लाख ६९ हजार ४५८, सातारा : दोन कोटी २८ लाख ८३ हजार ४७५.

निवडणुकीवर आयोगाचे विशेष लक्ष
Satara Assembly Election :अनेक मतदारसंघांत काट्याची टक्कर

३०९७ पोलिसांची नियुक्ती

मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ३०९७ पोलिस कॉन्स्टेबल तसेच २९४० होमगार्डस्‌ची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या आठ कंपन्या व राज्य राखीव दलाची एक कंपनी यांची नेमणूक केली आहे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

निवडणुकीवर आयोगाचे विशेष लक्ष
Satara Assembly Election : ग्रामीण भागात शिवशाही, निमआराम बस

...तर शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

मतदान केंद्रावर पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध असेल. यामध्ये सेक्टर ऑफिसर ४३६, केंद्राध्यक्ष ३९५६ व इतर कर्मचारी ११ हजार ८६९ असे एकूण १६ हजार २६१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करू नये, अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.’’

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.