धाकट्यावर आई-बाबांचे प्रेम; रागातून माेठ्या भावाने चिरला गळा

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक तानाजी बरडे, निरीक्षक किशोर धुमाळ, उमेश हजारे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक सागर आरगडे, वृषाली देसाई, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, रवी वाघमारे, विशाल पवार, पंकज बेसके व शिरवळ पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
Crime
CrimeSakal
Updated on

सातारा : आई-वडील माझ्यापेक्षा त्याच्यावरच जास्त प्रेम करतात. तो घरात माझ्यावरच लक्ष ठेऊन असतो. त्यामुळे आलेल्या रागातून 12 वर्षांच्या मुलानेच आपल्या आठ वर्षांच्या सख्या भावाचा गळा चिरून खून (Murdered) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नायगाव (ता. खंडाळा) येथे काल घडलेल्या या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) (local crime branch) अवघ्या चार तासांत उकल केली आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल (superintendent of police ajaykumar bansal) यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. (satara cirme news police arrested 12 year child shirwal)

नायगाव (ता. खंडाळा) येथील एका माळावर शेती कामास कर्नाटक येथील कुटुंबीय वास्तव्यास आहे. आई, वडील दिवसभर कामावर जातात. त्यांना दोन मुले आहेत. त्यातील एक आठ, तर दुसरा मुलगा बारा वर्षांचा आहे. ती दिवसभर घरी व परिसरात खेळत असतात. काल दोन्ही मुले परिसरात नेहमीप्रमाणे खेळत होती. काही वेळाने थोरला मुलगा भावाला तिथेच सोडून घरी आला. सायंकाळी कामावरून आल्यावर वडिलांना दुसरा मुलगा दिसला नाही. त्यांनी थोरल्याकडे विचारणा केली. त्यावर मला माहीत नसल्याचे त्याने सांगितले. उशिरापर्यंत लहान मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांना त्याचा शोध सुरू केला. या वेळी घराशेजारील पपईच्या बागेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला दिसला. त्याच्या गळ्यावर व डोक्‍यावर वार झाल्याचे दिसून येत होते.

या घटनेची माहिती गावात समजल्यानंतर परिसरात गर्दी झाली होती. हा धक्कादायक प्रकार काल समोर आला. या गंभीर प्रकरणाचा तातडीने शोध लावण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एलसीबीला केल्या होत्या. त्यानंतर पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी वार केलेली कुऱ्हाड आढळून आली. चिमुरड्याचा खून कोणी व का केला, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. पोलिसांनी आई-वडिलांकडे प्राथमिक चौकशी केली. त्यातून काही धागेदोरे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी थोरल्या भावाला ताब्यात घेतले.

कौशल्यपूर्वक तपास केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. आई-वडील लहान भावाला जास्त प्रेम करतात, तो माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठीच घरात राहतो, यातून आलेल्या रागातून हा प्रकार केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक तानाजी बरडे, निरीक्षक किशोर धुमाळ, उमेश हजारे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक सागर आरगडे, वृषाली देसाई, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, रवी वाघमारे, विशाल पवार, पंकज बेसके व शिरवळ पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

Crime
पंतप्रधान मोदी राज्याला देणार प्रतिमहिना 29 कोटी डोस; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Crime
'जनकल्याण'ने जपली सामाजिक बांधिलकी; 'पंतप्रधान-मुख्यमंत्री साहाय्यता'ला दिला भरघोस निधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()